आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालचे ब्रँडिंग करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अयशस्वी प्रशासक ठरल्या असे म्हणावे लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीत माेदींचे ‘विकास माॅडेल’ व त्यांचे (ममता बॅनर्जी) ‘विध्वंसक माॅडेल’ यांच्यात लढाई हाेणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भयंकर असे वातावरण तयार करण्यात आले आहे. जय श्रीराम अशी घाेषणा देणे काही गुन्हा ठरताे का? जय श्रीराम घाेषणा एेकून त्या एवढ्या का संतापतात? ममता दीदी जय श्रीरामचा घाेष येथे हाेणार नसेल तर मग ताे काय पाकिस्तानात हाेईल? तुम्ही केवळ विशिष्ट समुदायाच्या मतांवर डाेळा ठेवून राजकारण करत आहात. मला पूर्ण खात्री आहे. निवडणुकीनंतर हे बदलेल. तेव्हा ममता जय श्रीराम म्हणायला सुरुवात करतील.शहा म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येमागे दाेषींना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. शहा गुरुवारी कुचबिहार येथील सभेत बोलत होते.
‘सोनार बांग्ला’ घडवू
भाजपची परिवर्तन यात्रा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. राज्यातील अराजकता आणि राज्याचे परिवर्तन करण्याच्या उद्देशाने भाजप काम करू लागले आहे. आम्ही ‘साेनार बांग्ला’ घडवून दाखवणार आहाेत, असे शहा यांनी सांगितले. उत्तरेकडील बंगालच्या कुचबिहार येथे आयाेजित जाहीर सभेत ते बाेलत हाेते. भ्रष्टाचाराचे राज्य स्थापन करण्यामागे तृणमूलने काही कसर साेडलेली नाही, मे महिन्यानंतर ममता मुख्यमंत्री पदावर नसतील,असा दावा शहा यांनी केला.
२०० हून जास्त जागा मिळणार
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये २०० जागी विजय मिळेल, असा विश्वास वाटताे. २९४ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात हाेणाऱ्या घुसखाेरीच्या एकमेव कारणामुळे देखील ममतांना पराभवाला ताेंड द्यावे लागेल, असा दावा शहा यांनी केला.
९० जागी स्थलांतरित निर्णायक
विभाजनपासून आतापर्यंत बंगालमध्ये निवडणुकील जय-पराजयामध्ये स्थलातंरितांची भूमिका महत्त्वाची राहिली. गुरूवारी शहा यांच्या सभेत मतुआ समुदायाचा मोठा सहभाग होता. २०११ च्या जनगणनेनुसार बंगालमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १.८४ कोटी आहे. त्यात मतुआ समुदाय ५० टक्के आहे. उत्तर,दक्षिण २४ परगना, नदिया जिल्ह्यांतील सहा लोकसभा मतदारसंघात या समुदायाचा प्रभाव आहे. आता विधानसभेतही ९० जागांवर प्रभाव दिसेल.
शहा विजयी झाल्यास त्यांना गृहमंत्री करेल : ममता
अमित शहा निवडणूक लढवून जिंकल्यास त्यांना बंगालचे गृहमंत्री करेल. आम्ही कोणत्याही भारतीयाला बाहेरचे संबोधत नाहीत. परंतु बाहेरून गुंडागर्दी करण्यासाठी येतात. त्यांना बाहेरचे म्हणतो. राज्यात कोणालाही कधीही अडचण आलेली नाही. बाहेरून येणाऱ्यांना राज्य लुटू दिले जाणार नाही. बंगालचा माणूस बंगालला नियंत्रित करेल. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल (गुरुवारी दिल्लीत मीडिया कार्यक्रमात सहभाग)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.