आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Getting Angry Asked CM Nitish To Answer If Our Behavior Is Not Right We Will Be Burnt Alive

रेडलाइट भागात वाढले, पण सेक्स वर्कर नाही:संतप्त होत CM नितीश यांना जाब विचारला- 'आमची वागणूक योग्य नाही तर जिवंत जाळणार का'

नवी दिल्ली I भारती द्विवेदी​​​​​​​4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर हे बिहारचे चतुर्भुज ठिकाण. सभ्य लोकांसाठी कुप्रसिद्ध जागा. अशा ठिकाणी लोक दिवसा जाण्यास टाळाटाळ करतात, पण संध्याकाळच्या वेळी येथे त्यांचा जीवाला आराम मिळतो. त्याच बदनाम गल्लीतील एक मुलगी. जिने संकटांशी लढताना आपले नशीबच बदलले नाही. तर रेडलाईट भागात जगणाऱ्या मुलींना आपले नशीब बदलण्यासाठी धैर्य आणि संधी दिली. सामाजिक कार्यकर्त्या नसीमा खातून आज 'ये मैं हूं' मध्ये त्यांची कहानी सांगत आहेत. ज्यांचे बालपण ओळख लपवण्यात खोटेपणात गेले. पण आता त्या 'डॉटर ऑफ सेक्स वर्कर' असे अभिमानाने ओळख करू देतात.

मला सात आजी आणि तीन नानी होत्या

मी चतुर्भुजच्या रेडलाइट एरियामध्ये वाढले आहे. मी तिथल्या लालटेनपट्टी गल्लीत लहानाची मोठी झाले. लालटेनपट्टीच्या गल्लीला जगाचे तर सोडा चतुर्भुज परिसरातील लोक देखील अस्पृश्य मानतात. मला सात आजी होत्या. सात वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला ज्या या व्यवसायात होत्या. त्यांनी स्वत:चे कुटुंब बनवले. त्यांना एक मूल हवे होते. ज्यावर ते त्यांचे प्रेम व जीव ओततील. त्याची ही इच्छा परिसरातील बहुतांश लोकांना माहीत होती. जेव्हा त्यांना एक लावारिस (निराधार-हक्क नसलेला) मुलगा मिळाला. तेव्हा त्या सात जणींनी त्याला दत्तक घेतले. त्याला मुलाप्रमाणे वाढविले आणि चांगले शीक्षण दिले. त्यांच्या परंपरेनुसार, आजींनी त्यांचे लग्न सीतामढीच्या बोहा टोला रेड लाईट एरिया येथील मुलीशी लावले. माझ्या आई-बाबांचा बालविवाह झालेला होता. माझ्या आईलाही तीन महिलांनी मिळून वाढवले. अशा प्रकारे मला सात आजी आणि तीन नाणी होत्या. आज माजी एक आजी जीवंत आहे.

नसीमा यांच्या एका भावाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, दुसऱ्या भावाने त्याच्या सत्यतेमुळे संपूर्ण कुटुंबापासून दुरावले आहे. ते कुठे राहतात आणि काय करतात हे कोणालाच माहीत नाही.
नसीमा यांच्या एका भावाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, दुसऱ्या भावाने त्याच्या सत्यतेमुळे संपूर्ण कुटुंबापासून दुरावले आहे. ते कुठे राहतात आणि काय करतात हे कोणालाच माहीत नाही.

मी दररोज एक खोटं घेऊन शाळेत जायचे

नसीमा खातून म्हणाल्या की, आम्ही पाच भावंड. माझ्या वडिलांनी आम्हा बहिणींना खाजगी शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण आमच्या घराचा पत्ता कोणालाही सांगू नका अशी सक्त सूचना देखील आम्हाला दिलेली होती. मला आश्चर्य वाटते की हे काय आहे ? आणि असे का होते ? मला समजले नाही पण मला असे वाटते की दररोज मी माझ्या शाळेच्या पिशवीत काही तरी खोटं घेऊन जाते. आणि पुन्हा खोटे सोबत घेऊन येते. आमचे सत्य बाहेर येवू नये म्हणून रोज सायंकाळी मी आणि माझ्या मैत्रिणी विविध भागातून मार्ग बदलायचे. मैत्रिणींसोबत न जाण्यासाठी रोज एक नवीन खोटंस कारण किंवा किस्सा तयार केला जायचा. परिणामी मी एकटे राहणेच पसंद करू लागले.

आई-वडील वेगळे झाले, लोक टोमणे मारू लागले

एक तर मी रेडलाईट एरियात राहायचे. दुसरे म्हणजे माझी आई आम्हाला सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी राहायला गेली होती. त्यामुळे तिला लोक टोमणे मारत असत आणि मला दयेला पात्र मानत असे. वस्तीतील लोक रोज आईच्या नावाने टोमणे मारत असत. आमच्या भागातील महिला आम्हा बहिणींना म्हणायच्या मुलींनो चांगला व्यवसाय करा, पण तुमच्या आई सारख्या होऊ नका. इतर समाजाप्रमाणे रेडलाईट एरियामध्येही महिलांकडून चारित्र्याचा पुरावा मागितला जातो. तिचे चारित्र्य पुरुषाशी असलेल्या संबंधांवरून मोजले जाते. मात्र, या संपूर्ण प्रकरणामध्ये माझ्या वडिलांची चूक होती. त्याचे आणखी एका महिलेसोबत अफेअर होते. त्यामुळे दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. दोघांमध्ये खूप अंतर होते. मग माझी आई आम्हा सर्वांना सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करायला गेली. लहानपणी आई आम्हाला वाईट वाटायची, पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा कळाले की, आईची तर यात काहीच चूक नव्हती.

रेड लाईट एरियात आल्यावर सगळा कायदा फेल होतो

नसीमा म्हणाल्या की, मला माझे बालपण आठवते. अनेकदा आमच्या भागात पोलिसांचे छापे पडायचे. त्याला निश्चित वेळ नव्हता. छापा देखील असा केला जात असे की, अचानक कधीही संपूर्ण भागाची तपासणी केली जायची. पोलिसांसमोर माझ्या आजी गिडगिडायच्या हात जोडून विनवण्या करायच्या. ​​​​​​ तेव्हा पोलिस माझ्या सर्व आजींना अशा ठिकाणी लाठ्यांनी फटके द्यायच्या की, आज ते सांगू शकत नाही. मला समजले नाही की हे का होत आहे? आम्ही काही चुकीचे केले नाही, मग आमच्यासोबतच चुकीचे का होत आहे. पोलीस आले की आजी आम्हा बहिणींना पुस्तक घेऊन बसवायची किंवा कुणाच्या तरी घरी लपवायची. पोलिस आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ नयेत म्हणून हे केले जायचे. रेडलाईट एरियातील पोलीस कर्मचार्‍यांसाठी बालिका असो किंवा तरुण-तरुणी. ते सर्व व्यवसायिक होते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी कधीही फारशी दया दाखवली नाही.

नसीमाला अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वक्ता म्हणून बोलावण्यात आले आहे. यासोबतच ती TEDx च्या मंचावरही गेली होती. मास्टर ब्लास्टर सचीन तेंडूलकर यांच्या हस्ते नसीमा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नसीमाला अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वक्ता म्हणून बोलावण्यात आले आहे. यासोबतच ती TEDx च्या मंचावरही गेली होती. मास्टर ब्लास्टर सचीन तेंडूलकर यांच्या हस्ते नसीमा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रेड लाईट एरियातील प्रत्येक महिला सेक्स वर्कर नाही

रेड लाइट एरियामध्ये राहणाऱ्या सर्व महिला सेक्स वर्कर आहेत, असे अनेकदा लोकांना वाटते. हे साफ चुकीचे आहे. तुम्हाला या व्यवसाय करायचा की नाही याचेही येथे स्वातंत्र्य असते. तिथे मुजरा करणारे वेगळेच. कव्वालीचा वेगळा गट आहे. जे लोक सेक्सला आपला व्यवसाय म्हणून निवडतात ते वेगळे आहेत. मी आणि माझ्या बहिणींप्रमाणे त्या ठिकाणीच वाढले. पण आम्ही त्या व्यवसायापासून दूर राहिलो. माझी आई देखील रेड लाईट एरियातील होती. पण ती सेक्स वर्कर नव्हती. रेड लाईट एरियातील जग देखील सामान्यांसारखे असते. फक्त प्रत्येकाचा पेशा वेगळा असतो.

आता मला 'सेक्स वर्करची मुलगी' सांगण्याचा अभिमान वाटतो

या व्यवसायात असे घडते की आई आपल्या मुलींचे नेतृत्व करते किंवा नवीन मुलींचे नेतृत्व करते. जेणेकरून त्यांचे म्हातारपण सहज कापता येईल. माझ्या आजी माझ्या नातेवाईक नव्हत्या. त्यांची इच्छा असती तर आम्हा बहिणींना त्यांनी या व्यवसायात लावून म्हातारपण सुखाने घातले असते. लोकांनी त्यांना सल्ला देखील दिला असता की, जर तुम्ही असे केले नाही तर म्हातारपणी कसे जगणार. मात्र, माझ्या सर्व आजी नेहमी म्हणायच्या की, आमच्या आयुष्यात आम्ही जे केले ते तुमच्यासोबत होऊ देणार नाही. तुम्हा बहिणींचे काहीही वाईट होऊ देणार नाही. तुम्हाला आई-वडील असतील किंवा नसतील. माझ्या आजींच्या या निर्णयामुळे मी स्वतःला 'डॉटर ऑफ सेक्स वर्कर' म्हणू लागलो. 2001 मध्ये मी काही मुलींना जोडून 'परचम' नावाचा ग्रुप बनवला. ही गोष्ट जाहीरपणे सांगू लागलो. 'परचम' चा उद्देश हाच होता की आपण या परिसरात जन्मलो आहोत आणि त्यात आम्हाला लाज नाही.

नसीमाने 2004 मध्ये पाच पानी 'जुगनू' मासिक सुरू केले. सेक्स वर्कर्सची मुले हे मासिक लिहीत असत. आज हे मासिक ३८ पानांत छापले जाते. यात सेक्स वर्करच्या मुलांव्यतिरिक्त सामान्य लोकही आपले मत मांडतात.
नसीमाने 2004 मध्ये पाच पानी 'जुगनू' मासिक सुरू केले. सेक्स वर्कर्सची मुले हे मासिक लिहीत असत. आज हे मासिक ३८ पानांत छापले जाते. यात सेक्स वर्करच्या मुलांव्यतिरिक्त सामान्य लोकही आपले मत मांडतात.

महिला डीएमच्या पुढाकाराने बघण्याचा दृष्टीकोन बदलला

माझ्या आजींनी त्यांच्या कष्टाने बांधलेले घर एके दिवशी तेथील अत्याचारींनी ताब्यात घेतले. त्यावेळी मी आठवीची अंतिम परीक्षा देत होती. बेघर झाल्यानंतर शेजाऱ्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला दीड वर्ष आश्रय दिला. मग आम्ही सीतामढी नानी घराकडे निघालो. अभ्यास राहून गेला. 1995 मध्ये माझ्या बहिणीच्या लग्नामुळे आम्ही मुझफ्फरपूरला परतलो. त्यावेळी डीएम (जिल्हाधिकारी) राजबाला वर्मा कार्यरत होत्या. एके दिवशी 'आदिती' नावाच्या संस्थेतील एका महिलेला मी आमच्या भागात घेऊन आले. मी आणि त्या संस्थेतील महिला कार्यकर्ता आमच्या भागातील घरोघरी जाऊन लोकांशी जावून समस्या समजून घेत होते. यात बराच वेळ माझा गेला. शिधावाटप केंद्र, अंगणवाडी अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. या सगळ्यातून महिलांसाठी शिवण-विणकाम सुरू झाले. डीएम राजबाला वर्मा यांनी आमच्या भागात भेट दिल्यानंतर लोकांचा आमच्या परिसराबद्दलचा दृष्टिकोन बदलला. एका अर्थाने परिवर्तनाची लाट सुरू झाली.

लग्न न झाल्याने दहा दिवस उपोषण केले

नसीमा खातून म्हणाल्या, डीएम वर्मा आणि अदिती संस्थेच्या वतीने दुसऱ्या परिसरात काम सुरू झाले. मला क्रोशेच्या कामाची माहिती होती. म्हणून मी जायला लागले. त्यावेळी मी 15 वर्षांचा होते माझं काम इतकं चांगलं झालं असतं की ते तिथे प्रसिद्ध व्हायला लागलं. इतर वस्तीतील लोकांना ही गोष्ट आवडली नाही. मला कामावरून काढण्यासाठी माझ्या वडिलांकडे मुलगी बिघडली आहे. अशा गोष्टी ते बोलू लागले. मग जाणे बंद केले. मला सीतामढीला पाठवण्यात आले आणि तिथे लग्नाची चर्चा झाली. मी विरोध केला पण काम झाले नाही. तेव्हा मी उपोषण केले. मग माझ्या वडिलांनी मला विचारले तुला काय हवे आहे ? मी त्यांना म्हणाले की, माझ्या मैत्रिणींशी माझी ओळख करून दे, त्यानंतर मी जे सांगेन ते करेन. सीतामढीमध्ये अदिती संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली केंद्र मला माहीत होते. माझ्या वडिलांसोबत तिथे गेले. सुदैवाने मला तिथे बी.जी. श्रीनिवासन सापडल्या. बी.जी. याच बाई होत्या ज्या पहिल्यांदा आमच्या भागात डीएमसोबत आलेल्या होत्या. त्यांनी मला विचारले अरे तू इथे काय करती आहेस ? तू तर मुझफ्फरपूरमध्ये असायला होती. मी त्यांना काहीच सांगू शकत नव्हते. माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते. मी त्यांना माझ्या घरचा पत्ता दिला आणि निघाले.

'आदिती'शी जोडल्या गेल्याने जीवनाला दिशा मिळाली

वयाच्या 17 व्या वर्षी या संस्थेने मला सीतामढी येथे पर्यवेक्षक म्हणून नोकरी दिली. तिथल्या रेड लाईट एरियात प्रौढ शिक्षणावर चालू असलेल्या कामावर लक्ष ठेवणं हे माझं काम होतं. सुरुवातीला खूप त्रास झाला. तिथले लोक आणि ग्राहक या सगळ्यांनाच मला त्रास होऊ लागला. मी तिथल्या बायका-मुलींना लुबाडतेय असं त्या लोकांना वाटत असे. माझ्या वयाच्या सर्व मुली सकाळी उठून आपापल्या व्यवसायासाठी तयार व्हायच्या आणि मी बॅग घेऊन कामाला जायचे. मला हे कसे करायचे ते माहित नव्हते परंतु मला हे माहित होते की मी हे काम सोडले तर जीवन नरक होईल.

नसीमाने आजही तिचा अभ्यास सुरू ठेवला आहे. ती सध्या इग्नूमधून बी.ए. करत आहे.
नसीमाने आजही तिचा अभ्यास सुरू ठेवला आहे. ती सध्या इग्नूमधून बी.ए. करत आहे.

हे काम करित असताना माझ्यावर अनेकदा हल्ले झाले. पण मी घाबरले नाही. कामावरच्या हल्ल्याने मला बोलायला आणि लढायला शिकवलं. माझ्या वस्तीत पंचायत बोलावून मला चुकीचे बोलवण्यात आले. मला माझ्या वडिलांनी सांगितले होते की, माझ्या मुलीची कामातून सुटका करा नाहीतर तिला जातीबाहेर टाकीन, असे वडिलांना सांगण्यात आले. त्यानंतर माझे वडील म्हणाले बेटा हे समाजसेवेचे काम सोड. त्यावेळी मी घर सोडते, तुलाही सोडते. पण मी माझे काम सोडू शकत नाही, असे उत्तर मी वडीलांना दिले. त्यानंतर, मी बिहारच्या विविध भागातील रेड लाईट विभागाच्या सुधारणेसाठी काम करू लागले. दरम्यानच्या काळात मी मॅट्रिकचे शीक्षण पूर्ण केले.

जनता दरबारात मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला - मग त्यांना जीवंत जाळणार का

नसीमा खातून म्हणाल्या की, 2008 मध्ये काही लोकांनी सीतामढीच्या बोहा टोलाला आग लावली होती. लोक म्हणायचे की ही धरती जनक-जानकीची जागा आहे. इथे घाणेरडे काम होणार नाही. अनेकांना जिवंत जाळण्यात आले. तेथे राहणाऱ्या कुटुंबांचे खूप हाल झाले. त्यावेळी मी मुझफ्फरपूरला होते. याची माहिती मिळताच मी घटनास्थळ गाठले. सर्व काही पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मी जळालेल्या महिलांसह नितीशकुमार यांच्या जनता दरबारात पोहोचले. तिथे पोहोचण्यासाठी आधी आमची ओळख उघड केली नाही. अन्यथा आम्हाला प्रवेशच दिला गेला नसता.

जेव्हा आम्हाला बोलण्याची परवानगी दिली गेली, तेव्हा नसीमा म्हणाल्या की, आम्ही सर्व जण रेड लाईट एरियातून आलेलो आहोत. या भागात झालेल्या घटनेची माहिती सांगितली. हे ऐकून त्यांचे उत्तर आले की तुमच्या भागातील लोकांचे वर्तन चांगले नाही असे ऐकले आहे. त्या एका उत्तराने मला इतका राग आला की, मी त्याच्या डेस्कवर हात मारला आणि म्हणाले - 'वर्तवणूक योग्य नसेल तर मला जिवंत जाळले जाईल का? घटनेत किंवा कोणत्याही कायद्यात असे काही लिहिले आहे का. जर कोणाचे वर्तन योग्य नसेल तर त्याला जिवंत जाळून टाका. माझी प्रतिक्रिया पाहून त्याला आश्चर्य वाटले. मला शांत करण्यासाठी आम्हा सर्वांना पाणी देण्यात आले. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकले.

नसीमा यांनी बोहा टोला येथील सेक्स वर्करना त्यांची जमीन मिळवून देण्यासाठी दीर्घ लढा दिला.
नसीमा यांनी बोहा टोला येथील सेक्स वर्करना त्यांची जमीन मिळवून देण्यासाठी दीर्घ लढा दिला.

लग्नाचा प्रस्ताव आला- तेव्हा सांगितले, मी जिथे राहते तिथे आधी भेटायला या

माझे लग्न राजस्थानमध्ये झाले. मी आंतरधर्म आणि प्रेमविवाह केला होता. पटना येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेदरम्यान मी माझ्या पतीला भेटले होते. लग्नाच्या अनेक ऑफर नेहमीच येत होत्या, पण जो मला माझ्या ओळखीने स्वीकारेल त्याचा हात मी धरायचा हे मी ठरवले होते. माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा मी सर्वात आधी म्हणाले की, मी कुठे राहते ते बघ. एके दिवशी माझ्या अनुपस्थितीत तो माझ्या भागात गेला. लोकांना भेटला आणि लग्न कुठे करायचे ते सांगा. पण मग मी म्हणाले तुझे कुटुंब मला स्वीकारेल का?

नसीमा 'परचम'च्या माध्यमातून पथनाट्ये करून रेड लाइट एरियातील महिलांना जागरूक करतात. त्यांना शिक्षण आणि इतर रोजगारासाठी प्रेरणा देतात.
नसीमा 'परचम'च्या माध्यमातून पथनाट्ये करून रेड लाइट एरियातील महिलांना जागरूक करतात. त्यांना शिक्षण आणि इतर रोजगारासाठी प्रेरणा देतात.

त्यानंतर 2009 मध्ये होळीच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राजस्थानला गेले होते. मी त्यांच्या वडिलांना कुटुंबियांना भेटले. त्यांना मी लिहिलेले 'सफ' हे पुस्तक भेट दिले. त्या पुस्तकात माझ्याशिवाय आणखी चार स्त्रियांविषयी माहिती होती. मी त्यांना विचारले की, तुम्हाला तुमच्या मुलाने काय सांगितले ते मला माहित नाही. पण मी कोण आहे, मी काय आहे याची नोंद या पुस्तकात आहे. तुम्ही सर्वांनी एकदा वाचा. जर तुम्ही मला तुमच्या घरची सून बनवणार असाल तर माझ्या वास्तवासह मला दत्तक घ्यावे लागेल. तुम्ही सर्वांनी जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. पण माझ्याकडून धर्म बदलण्याची किंवा नाव बदलण्याची अपेक्षा करू नका. असे बोलून मी निघाले. माझ्या सासऱ्यांनी काही वेळाने मला सांगितले की, जर तू माझ्या घरची सून झालीस तर मला खूप आनंद होईल. असे झाले नाही तर माझा मुलगा त्याच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, असेच म्हणावे लागेल. 2010 मध्ये आमचे लग्न झाले आणि आज माझा मुलगा 11 वर्षांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...