आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Free Electricity Is Over: Delhiites Will No Longer Get Free Electricity, Kejriwal Says

मोफत विजेची सद्दी संपली:दिल्लीकरांना आता मिळणार नाही मोफत वीज, केजरीवाल म्हणाले – आता मागेल त्यालाच मोफत वीज

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी वीज सबसिडीबाबत मोठी घोषणा केली आहे. राजधानीत सध्या दिले जाणारे वीज सबसिडी 1 ऑक्टोबर 2022 पासून बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला वीज सबसिडीची गरज आहे की नाही याचा पर्याय आम्ही जनतेला देऊ. ज्यांना नको आहे त्यांना वीज सबसिडी मिळणार नाही. म्हणजेच सर्वांना मोफत वीज मिळणार नाही. केजरीवाल म्हणाले की, आम्हाला वीज सबसिडी नको असे म्हणणारे अनेक लोक भेटतात. हा पैसा तुम्ही शाळा उघडण्यासाठी, हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेत आल्यापासून दिल्लीतील जनतेला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देत आहे. ग्राहकांना सध्या 200 युनिटपर्यंत कोणतेही बिल भरावे लागत नाही, तर महिन्याला 201 ते 400 युनिट वीज वापरल्यास 800 रुपये अनुदान मिळते. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच मध्यमवर्गीयांनाही त्याचा लाभ मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...