आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ISI Aims To Spread Terror In Kashmir Like 'Operation Red Wave', Latest News And Update

पाककडून 34 वर्षे जुन्या कटाची पुनरावृत्ती:ISI चे काश्मीरमध्ये 'ऑपरेशन रेड वेव्ह', 1988 सारखी दहशत पसरविण्याचे उद्दीष्ट

नवी दिल्ली/श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगप्रकरणी पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISI च्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने काश्मीर खोऱ्यात 1988 सारखी दहशत पसरविण्याचे कारस्थान रचले आहे. ऑपरेशन रेड व्हेव नामक हा कट पाकने गतवर्षी सप्टेबर महिन्यात रचला. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती पाकच्या या कटाचे ठोस पुरावे हाती लागलेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादेत गत सप्टेबर महिन्यात आयएसआयचे अधिकारी व अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांत एक बैठक झाली. त्यात खोऱ्यातील जवळपास 200 जणांना ठार मारण्याचा कट रचला गेला. यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन रेड व्हेवचा कट 1988 च्या ऑपरेशन तुपाकच्या धर्तीवर रचण्यात आला.

ऑपरेशन तुपाकनंतर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचे मोठ्या प्रमाणात पलायन सुरू झाले होते. एका अंदाजानुसार त्यावेळी जवळपास 1 लाख 20 हजार पंडित विस्थापित झाले होते.
ऑपरेशन तुपाकनंतर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचे मोठ्या प्रमाणात पलायन सुरू झाले होते. एका अंदाजानुसार त्यावेळी जवळपास 1 लाख 20 हजार पंडित विस्थापित झाले होते.

काय होते ऑपरेशन तुपाक?

1988 साली ISI च्या मदतीने इंडियन मुजाहिदीनसह 6 अतिरेकी संघटनांनी काश्मीरमध्ये ऑपरेशन तुपाक सुरू केले होते. ते 1990 पर्यंत चालले. दुष्ट हेतूने सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये 300 हून अधिक काश्मिरी पंडितांचा बळी गेला होता. हे ऑपरेशन पाकचे तत्कालीन राष्ट्रपती झिया उल हक यांच्या इशाऱ्यानुसार राबवण्यात आले होते.

आयएसआय हेच खरे मूळ - एसपी वैद्य
दिव्य मराठीशी संवाद साधताना जम्मू काश्मीरचे् माजी पोलिस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यामागे आयएसआयचा हात असल्याचे स्पष्ट केले. 1988 चे ऑपरेशन तुपाक असो किंवा आताचा काश्मीरमधील हिंसाचार. सर्वांच्या मुळाशी पाकची गुप्तहेर संस्था आहे, असे ते म्हणाले.

गतकाही वर्षांत खोऱ्यात आयएसआयच्या मदतीने अनेक स्थानिक अतिरेकी संघटना अस्तित्वात आल्यात. या संघटना काश्मिरी पंडित व हिंदूंच्या हत्येची जबाबदारी घेत आहेत.
गतकाही वर्षांत खोऱ्यात आयएसआयच्या मदतीने अनेक स्थानिक अतिरेकी संघटना अस्तित्वात आल्यात. या संघटना काश्मिरी पंडित व हिंदूंच्या हत्येची जबाबदारी घेत आहेत.

22 दिवसांत 9 जणांची हत्या
काश्मीरमध्ये यंदा झालेल्या अतिरेकी हल्ल्यांत 20 जणांचा बळी गेला आहे. यातील 9 हत्या गत 22 दिवसांत झाल्या. त्यात 5 हिंदू व 3 सुरक्षा जवानांचा समावेश आहे. हे जवान सुट्टीवर आले होते. गुरुवारीच खोऱ्यातील काश्मीर फ्रीडम फायटर नामक एका अतिरेकी संघटनेने सर्वांची अशीच गत होणार असल्याचा इशारा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...