आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ISI Honey Trap In Rajasthan; Trained Pakistani Women Making Friends With Border People India To Steal Intel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसआयचे हनी ट्रॅप:सीमेलगत भारतीय युवकांना फूस लावून गुप्तहेर बनवत आहेत पाकिस्तानच्या प्रशिक्षित महिला; अशी मिळत आहेत गुप्त माहिती

श्रीगंगानगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानी महिला सीमावर्ती भागातील युवकांसह लष्करी जवानांना करत आहेत लक्ष्य

पाकिस्तानचे गुप्तचर विभाग आयएसआय भारताची गुप्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या देशातील महिलांना सीमेलगत युवकांना फूस लावण्याची ट्रेनिंग देत आहे. पाकिस्तानने अशा प्रशिक्षित महिलांची टोळी तयार केली आहे. या महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय युवकांशी मैत्री करून टार्गेट करत आहेत. या महिला गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या सीमा भागातील युवकांच्या संपर्कात आहेत. कधी प्रेमाचे तर कधी पैशांचे अमीष देऊन त्या युवकांकडून माहिती गोळा करत आहेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे, या तरुणींनी ज्या युवकांना लक्ष्य केले त्यापैकी बहुतांश युवक बीएसएफ किंवा लष्करात काम करत आहेत.

राजस्थानलाच लक्ष्य का करत आहे पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तानची सीमा रेषा जवळपास 3323 किलोमीटर इतकी लांब आहे. याचा सर्वात मोठा 1222 किमीचा भाग जम्मू आणि काश्मीरला लागून आहे. त्यानंतर दुसरी सर्वात मोठी सीमा (1170 किमी) राजस्थानला लागून आहे. यासोबतच, गुजरातला 506 किमी, पंजाबला 425 किमी एवढी सीमा पाकिस्तानला लागून आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे, राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्हा पाकिस्तानच्या बहावलपूरला लागून आहे. याच ठिकाणी पाकिस्तानची सर्वोच्च गुप्तचर संस्था आयएसआयचे मुख्यालय आहे. सोबतच, श्रीगंगानगर परिसरात भारतीय लष्कराच्या छावण्या आहेत. तसेच भारतीय हवाई दलाच्या हालचाली या ठिकाणी पाहायला मिळतात. दरवर्षी याच ठिकाणी लष्करी सराव सुद्धा केला जातो. त्यामुळेच पाकिस्तानी महिला गुप्तहेर येथील युवकांना टार्गेट करत आहेत.

सीमेवर पकडले पाकिस्तानी गुप्तहेर

2011 मध्ये सूरतगड जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या क्लार्क पवन शर्माला सीआयडीने पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवल्याप्रकरणी अटक केली होती. जानेवारी 2019 मध्ये जैसलमेर छावणीत तैनात जवान सोमवीरला पाकिस्तानी महिला गुप्तहेराने अनिका चोपडा या नावाने टार्गेट केले होते. तिने फेसबूकवरून या सैनिकासोबत मैत्री केली होती. महिलेने एकूण 45 जवानांशी मैत्री केली होती. पण, प्रेमाच्या जाळ्यात केवळ सोमवीरल अडकला होता. याच नादात त्याने लष्कराची माहिती तिला पाठवली होती. 6 जून 2020 रोजी लालगडच्या जाटान छावणीतून विकास जाट आणि चिमनलाल नायक यांना पकडण्यात आले. हे दोघे अनुष्का चोपडा नावाने फेसबूक आयडी असलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होते.

भारतीय सीमेपर्यंत पाकिस्तानी टॉवरचे नेटवर्क

बीएसएफच्या गुप्तचर विभागाचे निवृत्त डेप्युटी कमांडंट ओपी चाहर यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीय सीमा भागात पाकिस्तानात टॉवरचे नेटवर्क आहे. यातून पाकिस्तानी सिमकार्डच्या माध्यमातून आपल्या देशातील सीमा भागातून सुद्धा संपर्क केला जाऊ शकतो. लष्कर आणि निमलष्करी दलात सायबर क्राइम यामुळेच वाढत आहे. एक तर सैनिकांना सोशल मीडिया अकाउंट चालवण्यावर बंदी लावायला हवी किंवा त्यांना सोशल मीडियावर आपली सैनिक असल्याची ओळख लपवून ठेवावी. कारण, आयएसआय अशाच सैनिकांना लक्ष्य करत असते.

बातम्या आणखी आहेत...