आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांचा कट उधळला:दिल्लीमध्ये आयएसचा दहशतवादी चकमकीनंतर अटकेत, आयईडी विस्फोटक केले जप्त, घटनास्थळी एनएसजी कमांडो तैनात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कटात सामिल असलेले लोक आणि दहशतवाद्याच्या मदतगारांची शोध मोहिम सुरू
  • अटक केलेला दहशतवादी अबू यूसुफ खानने अनेक भागांमध्ये हेरगिरी केली होती

दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट मोडला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने एन्काउंटरनंतर इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) च्या एका दहशतवाद्याला अटक केले. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक राउंड फायरिंग झाली होती. दहशतवाद्यांजववळ आयईडी स्फोटकंही सापडले आहे. ते निष्क्रिय करण्यात आले आहेत.

पोलिसांनी धौला कुआं आणि करोल बागच्या मध्ये रिज रोडवर बुद्ध जयंती पार्कजवळ शुक्रवारी रात्री दशतवाद्याला अटक केली होती. बुद्धा जयंती पार्कच्या जवळपास नॅशनल सिक्योरिटी गार्ड (एनएसजी) चे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

फरार झालेल्या एका दहशतवाद्याची शोध मोहिम सुरू
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अबू यूसुफ खान आहे. त्याची लोधी रोड येथील स्पेशल सेलच्या ऑफिसमध्ये चौकशी केली जात आहे. यूसुफने अनेक भागांमध्ये हेरगिरी केलेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार एन्काउंटर दरम्यान दूसरा दहशतवादी फरार झाला, त्यांच्या शोध मोहिमेत पोलिस अनेक भागांमध्ये छापेमारी करत आहेत. दहशतवाद्यांची मदत करण्यांचाही शोध घेतला जात आहे.

आयएसच्या कनेक्शनच्या आरोपात बंगळूरमध्ये डॉक्टरला केली होती अटक
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजेंसी (आयएसए) ने सोमवारी ही कारवाई केली होती. अटक करण्यात आलेला डॉक्टर रहमान (28) एणएस रमैया मेडिकल कॉलेजमध्ये ऑप्थेलमोलॉजिस्ट राहिला आहे. रहमानची लिंक आयएसशी जुळाली असल्याचा आरोप आहे. रहमानची अटक एका व्यक्तीकडून आणि त्याच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आली. पती-पत्नीला मार्चमध्ये दिल्लीत अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...