आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:बांगलादेश हिंसाप्रकरणी इस्कॉनची 23 ऑक्टोबर रोजी 150 देशांत निदर्शने

ढाका/कोलकाता/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान अल्पसंख्याक हिंदू आणि त्यांच्या धर्मस्थळांवर झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात १५० देशांत निदर्शने करण्यात येतील. इंटरनॅशनल सोसायटी फाॅर कृष्णा काॅन्शसनेसचे (इस्कॉन) अनुयायी निदर्शने करतील. कोलकाता येथील इस्काॅनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी मंगळवारी ही माहिती दिली. २३ आॅक्टोबरला एक दिवस निदर्शने आणि प्रार्थनासभा आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

बांगलादेशातील कमिल्ला जिल्ह्यात दुर्गापूजेदरम्यान एका पंडालमध्ये कथितरीत्या कुराणाचा अपमान झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर संपूर्ण देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचार उसळला. दुर्गापूजा पंडाल आणि हिंदू मंदिरांत तोडफोड करण्यात आली. इस्काॅनच्या मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले. नोआखालीत इस्काॅनच्या दोन साधूंना जमावाने ठार केले. त्यानंतर इस्काॅनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांनाही या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...