आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Islamic Education Center Darul Uloom Deoband Teaches Gita, Ramayana And Vedas Along With Holy Quran

फतव्यांच्या पलीकडे:इस्लामिक शिक्षण केंद्र दारुल उलूम देवबंदमध्ये पवित्र कुराणसोबत गीता, रामायण आणि वेदांच्या ऋचांचेही शिक्षण

देवबंद, सहारनपूर (एम. रियाझ हाश्मी )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेद आणि संस्कृत शिकणारे आपल्या नावात वापरतात ‘चतुर्वेदी’, येथे गीता-कुराणवर होते संशोधन

उत्तर प्रदेशच्या देवबंदमध्ये १६४ वर्षे जुने आशियातील सर्वात मोठे इस्लामिक िशक्षण केंद्र दारुल उलूम हे कुराण, हदीसचे शिक्षण तसेच आपल्या फतव्यांसाठी ओळखले जाते. येथील ग्रंथालयात दाढी आणि टोपी घातलेले विद्यार्थी कुराणातील आयती, वेदांच्या ऋचा आणि गीता तसेच रामायणांतील श्लोक म्हणताना दिसतात. वास्तविक ही संस्था विद्यार्थ्यांना गीता, रामायण, वेद, बायबल, गुरुग्रंथ आणि इतर अनेक धर्मांतील ग्रंथांची शिकवण देते. दारुल उलूमबाबतची माहिती बहुतांश लोकांना आश्चर्यकारक वाटू शकते, परंतु दरवर्षी येथून उत्तीर्ण होऊन अशा विशेष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३०० आहे. यात ५० जागा हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमासाठी असतात. दारुल उलूमचे माध्यम प्रतिनिधी अशरफ उस्मानी सांगतात की, येथे विद्यार्थी मौलवीची पदवी मिळवल्यानंतर विशेष अभ्यासक्रम निवडू शकतात. येथील शिक्षणाचे ३४ विभाग आहेत. ४ हजारांहून अधिक विद्यार्थी येथे अध्ययन करतात. उस्मानी सांगतात की, २४ वर्षांपूर्वी देवबंदच्या कार्यकारी समितीने हा विशेष अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, हिंदू धर्माशिवाय ख्रिश्चन, ज्यू, पारसी, शीख व इतर धर्मही शिकवले जातात. हे अभ्यासक्रमही असे बनवले आहेत की ते शिकताना विद्यार्थी परिपक्व व्हावेत. हे अभ्यासक्रम दोन ते चार वर्षांपर्यंतचे असतात. दारुल उलूममधून पासआऊट देशाचे प्रमुख अलीम मौलाना अब्दुल हमीद नोमानी हे या अभ्यासक्रमांचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. त्यांनी स्वत: मुख्य १२ उपनिषद, चार वेद, गीता आणि रामायणाचा अभ्यास केला आहे. त्यांनीच हिंदू धर्म आणि दर्शनाशास्त्राचा अभ्यासक्रम तयार केला आहे. युवा मौलाना इश्तियाक कासमी चतुर्वेदी सांगतात की, त्यांनी मौलवी म्हणून पदवी घेतल्यानंतर चारही वेद, गीता तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला. संस्कृतचे ते पंडित असल्याने आपल्या नावात ते चतुर्वेदी लिहितात. सध्या ते गीता व कुराणबाबत संशोधन करत आहेत. ते सांगतात की, धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासानंतर मला उमगले की, या सर्वांतून शांतता, सद््भावनेबाबत अल्ला, ईश्वर आणि परब्रह्माचा संदेश मिळतो. दुसरे एक विद्यार्थी मौलाना अब्दुल मलिक कासमी यांच्यानुसार, “ही धार्मिक पुस्तके अभ्यासणे म्हणजे डोळे उघडणारा अनुभव आहे. या अभ्यासातून माझा दृष्टिकोनच बदलला आणि दोन्ही धर्मांच्या शिक्षणात मला अद््भुत असे साम्य आढळले.’

येथे ६००-८०० वर्षांपूर्वीचे ग्रंथ
येथील ग्रंथालयात २ लाख पुस्तके व १,५००हून अधिक दुर्मिळ पांडुलिपी आहेत. यातील अनेक ६०० ते ८०० वर्षांपूर्वीचे आहेत. प्रभारी शफिक येथील ऋग्वेद, यजुर्वेद, रामायण, तुलसीदासांचे रामचरितमानस, मनुस्मृती, विष्णुस्मृती यांचा संग्रह श्रद्धेने जपत असल्याचे सांगतात.
फतव्यांच्या पलीकडे | २४ वर्षांपासून शिकवला जातोय संस्कृतीचा पाठ, मौलवी झाल्यावर विद्यार्थी इतर धर्मांचा अभ्यास करतात

बातम्या आणखी आहेत...