आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात दहशतवाद पसरवत असलेली आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएस) गेल्या काही वर्षांत भारतातील तब्बल १२ राज्यांत बस्तान बसवले आहे. इराण आणि सीरियातील सुन्नी जिहादींची अतिरेकी संघटना आयएसने केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मिरात सर्वात जास्त सक्रिय आहे. ही माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी बुधवारी राज्यसभेत भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, एनआयएच्या तपासात आयएसच्या अनेक प्रकरणांची माहिती उजेडात आली आहे. एनआयएने दक्षिणेकडील तेलंगण, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडूत आयएसच्या उपस्थितीबाबत १७ गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत १२२ जणांना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.