आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ISRO Chief K Sivan Update | Indian Space Research Organisation Chairman K Sivan Latest News Updates Om Private Space Sector

खासगी कंपन्या रॉकेट बनवणार:इस्रो चीफ के. सिवन म्हणाले- खासगी कंपन्या आल्यावर स्पेस सेक्टरला बळकटी मिळेल

बंगळुरू2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रो प्रमुख के. सिवन यांनी गुरुवारी सरकारच्या स्पेस सेक्टरला खासगी कंपन्यांसाठी उघडण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले- सरकारने स्पेस सेक्टरमध्ये चांगलीच सुधारणा केली आहे. आता खासगी कंपन्यांनाही रॉकेट आणि सॅटेलाइट बनवण्याची परवानगी मिळेल. लॉन्चींगसंबंधी कामामध्येही खासगी कंपन्या सामील होऊ शकतील. तसेच, दुसऱ्या ग्रहांची माहिती मिळवण्यासाठी इस्रोच्या स्पेस मिशनमध्येही सामील केले जाईल. यामुळे फक्त इंडियन स्पेस सेक्टर मजबुत होणार नाही, तर आर्थिक विकासातही गती येईल.

केंद्र सरकारने बुधवारी भारतीय स्पेस सेक्टरला खासगी कंपन्यासाठी उघडल्याची घोषणा केली. यासाठी एक नवीन संस्था उघडली जाईल. याचे नाव इंडियन नॅशनल स्पेस, प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर असेल. ही संस्था स्पेस अॅक्टिविटीजमध्ये खासगी कंपन्याना मदत करेल.

इस्रोच्या कामावर परिणाम होणार नाही

सिवन पुढे म्हणाले की- भारतीय स्पेस सेक्टरमध्ये झालेल्या या बदलाचा इस्रोवर कोणताच परिणाम पडणार नाही. आम्ही आधीप्रमाणे रिसर्च आणि डेव्हलपमेंट, दुसऱ्या ग्रहांपर्यंत स्पेसक्राफ्ट पाठवणे आणि ह्यूमन मिशनवर काम सुरुच ठेवणार. स्पेस सेक्टरमध्ये सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम अनेक काळापर्यंत दिसेल. भारत जगातील त्या देशांमध्ये सामील होईल, जिथे खासगी कंपन्यांना स्पेस स्टेक्टरमध्ये चांगले काम करण्याची संधी मिळते.

बातम्या आणखी आहेत...