आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ISRO EOS 03 Mission Could Not Be Accomplished Due To Performance Anomaly In Cryogenic Stage

मिशन फेल:अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट लाँच फेल; तिसऱ्या स्टेजमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मिशन अपुरे; चीन-पाक सीमांवर नजर ठेवण्याची होती तयारी

श्रीहरीकोटा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03 चे प्रक्षेपण गुरुवारी अपयशी ठरले. या उपग्रहाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून सकाळी 5.43 वाजता झेप घेतली. परंतु, निश्चित अवधीच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी तिसरी स्टेज अर्थात क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड आले.

उपग्रह निर्धारित कक्षेत स्थापित होऊ शकले नाही. तांत्रिक बिघाडांमुळे उपग्रहाचा नियंत्रण कक्षापासून संपर्क तुटला. यानंतर इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी मिशन फेल ठरल्याची माहिती दिली.

यापूर्वी तीनदा थांबवले गेले मिशन

या उपग्रहाला 'आय इन द स्काय' अर्थात आकाशातील डोळा असे नाव देण्यात आले होते. महामारीमुळे इस्रोच्या संशोधन आणि लाँचिंग प्रकल्प रखडले होते. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे इस्रोच्या कामाला वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे, यापूर्वी EOD-03 चे लाँचिंग तीन वेळा स्थगित करावे लागले होते. आता हे मिशन फेल गेल्यानंतर लवकरच नवीन मिशनच्या तारखेची घोषणा होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

का महत्वाचे होते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03

  • या उपग्रहाला जिओ इमेजिंग उपग्रह -1 (GISAT-1) असेही म्हटले जात आहे. याद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही लक्ष ठेवता येईल. या कारणास्तव या उपग्रहाला 'आय इन द स्काय' असेही म्हटले जात आहे.
  • अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अलीकडेच राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS - 03) दररोज 4-5 वेळा संपूर्ण देशाचे इमेजिंग करण्यास सक्षम आहे. या उपग्रहाच्या साहाय्याने पाणवठे, पिके, वनस्पतींची स्थिती आणि वन संरक्षणाच्या बदलांचे रिअल टाइम निरीक्षण करणे शक्य होईल. हे पूर आणि चक्रीवादळांबद्दल देखील अचूक माहिती देणार होते.
  • हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. त्यानंतर ते 'आय इन द स्काय' म्हणजेच इस्रोचा आकाशातील डोळा म्हणून काम करेल. हा उपग्रह पृथ्वीच्या रोटेशनसोबत सुसंगत असेल, ज्यामुळे तो एका ठिकाणी स्थिर असल्याचे दिसून येईल.
  • या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरील मोठ्या भागाची रिअल-टाइम माहिती प्रदान करण्यास मदत होईल. इतर रिमोट सेन्सिंग उपग्रह खालच्या कक्षेत आहेत आणि ते नियमित अंतराने एका ठिकाणी परत येतात. त्या तुलनेत, EOS-03 दिवसातून चार-पाच वेळा देशाचे छायाचित्र काढेल आणि विविध एजन्सींना हवामान बदल डेटा पाठवेल असे सांगितले जात होते. (येथे सविस्तर वाचा)
बातम्या आणखी आहेत...