आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रोला मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी डीआरडीओ आणि वायुदलासोबत रविवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये (एटीआर) पुन्हा वापरात आणता येऊ शकणाऱ्या लाँच व्हेइकल स्वायत्त लँडिंग मिशनची (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वी चाचणी घेतली. सकाळी ७.१० वाजता आरएलव्हीने उड्डाण भरले व ७.४० वाजता एटीआर एअर स्ट्रिपमध्ये लँड केले.
असे केले संचालन : {अारएलव्ही एलईएक्स वायुदलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे आणण्यात आले. {ते ४.५ किमी उंचीवर नेण्यात आले आणि ४.६ किमीच्या रेंजवर सोडण्यात आले. {स्वत:च लँड झाले.
अभियानामध्ये यांची भागीदारी इस्रो, वायुदल, सेंटर फॉर मिलिट्री एअरवर्थनेस अँड सर्टिफिकेशन, वैमानिकी विकास प्रतिष्ठान आणि एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.