आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा:ISRO ने लॉन्च केले 42वी कम्युनिकेशन सॅटेलाइट, ही कोरोना काळातील दुसरे आणि या वर्षातील तिसरे मिशन

चेन्नई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे सॅटेलाइट भारताच्या जमिनी क्षेत्रासह अंडमान-निकोबार आणि लक्षद्वीपलाही कव्हर करेल

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) ने श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून गुरुवारी कम्युनिकेशन सॅटेलाइट (CMS-01) लॉन्च केले. ही लॉन्चिंग दुपारी 3.41 मिनीटांवर PSLV-C50 रॉकेटमधून झाली. भारताची ही कोरोना काळातील दुसरी आणि या वर्षातील तिसरी लॉन्चिंग आहे.

CMS-01 भारतचे 42वे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. हे भारताच्या जमिनी क्षेत्रासह अंडमान-निकोबार आणि लक्षद्वीपलाही कव्हर करेल. हे ISRO चे या वर्षातील अखेरचे मिशन आहे. हे सॅटेलाइट सात वर्षे काम करेल.

44 मीटर उंच आणि चार स्टेज असलेल्या PSLV-C50 'XL' कॉन्फिग्रेशनमध्ये PSLV चे हे 22 वे उड्डाण आहे. नॉर्मल कॉन्फ्रिगेशनमध्ये PSLV चार स्टेज / इंजिन असलेले रॉकेट आहे. कोणत्याही मिशनसाठी वापर होणाऱ्या रॉकेटची निवड सॅटेलाइटचे वजन आणि त्या ऑर्बिटवर अवलंबुन असते जिथे सॅटेलाइटला परिक्रमा करायची आहे.

लॉन्चिंगच्या 20 मिनीटानंतर PSLV-C50 सॅटेलाइटला इजेक्ट करेल. CMS-01 ऑर्बिटमध्ये GSAT-12 ची जागा घेईल. 1,410 किलो वजनी GSAT-12 ला 11 जुलै, 2011 मध्ये लॉन्च केले होते. त्याचा कार्यकाळ आठ वर्षांचा होता.

बातम्या आणखी आहेत...