आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ISRO Satellite EOS 01 Launch Sriharikota Update | ISRO Earth Observation Satellite EOS 01 Launch Today News Live Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सॅटलाइट लॉन्चचे काउंटडाउन:ISRO आज 3 वाजून 2 मिनिटांनी रडार इमेजिंग सॅटलाइट लॉन्च करणार, कोरोना काळात पहिले मिशन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजची लॉन्चिंग यशस्वी ठरली तर ISRO च्या विदेशी सॅटलाइट पाठवण्याचा आकडा 328 होईल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात हे ISRO चे पहिले उपग्रह प्रक्षेपण असेल. यामध्ये PSLV-C49 रॉकेट आपल्यासोबत देशातील रडार इमेजिंग उपग्रह EOS01 आणि अन्य 9 विदेशी उपग्रह घेऊन जाईल.

EOS01 ची खासियत काय?
हे रडार इमेजिंग सॅटलाइट आहे. याचे सिंथेटिक अपरचर रडार ढगांच्या पलिकडेही पाहू शकेल. हे दिवस-रात्र आणि प्रत्येक वातावरणात फोटो घेऊ शकेल. यामुळे आकाशातून देशाच्या पलीकरच्या सीमांवर नजर ठेवण्यात मदत मिळेल. यासोबतच अॅग्रीकल्चर-फॉरेस्ट्री, मातीतील ओलावा आणि डिजास्टर मॅनेजमेंटमध्येही सपोर्ट करेल.

सोशल मीडियावर LIVE टेलीकास्ट होईल
आजची लॉन्चिंग यशस्वी ठरली तर ISRO च्या विदेशी सॅटलाइट पाठवण्याचा आकडा 328 होईल. हे ISRO चे 51 वे मिशन असेल. ISRO आपली वेबसाइट, यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर याचे LIVE टेलीकास्ट करेल. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे डायरेक्टर एस सोमनाथ यांनी सांगितले की, PSLV-C49 नंतर सप्टेंबरमध्ये PSLV-C50 लॉन्च करण्याची योजना आहे. एका लॉन्चनंतर दुसऱ्यासाठी तैयारी करण्यात जवळपास 30 दिवसांचा कालावधी लागतो.