आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेचे अधिवेशन:‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांमध्ये रस्त्यानंतर संसदेतही शेतकऱ्यांचाच मुद्दा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत चर्चेऐवजी गोंधळ, सभागृहांचे कामकाज स्थगित

तीन नव्या कृषी कायद्यांमुळे रस्त्यानंतर आता संसदेतीलही वातावरण तापले आहे. अर्थसंकल्पानंतर मंगळवारी संसदेचा पहिला दिवस जय जवान- जय किसानच्या घोषणांमुळे गोंधळात गेला. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर विरोधकांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला. तसेच शेतकरी मुद्यावर चर्चेची मागणी केली.

राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांनी सांगितले की, कृषी कायद्यांवर आधीच चर्चा झाली आहे. आता त्याची गरज नाही. नायडू म्हणाले की, शेतकरी आंदाेलनावर आज नव्हे, उद्या चर्चा होईल. परंपरेनुसार आधी लोकसभेत चर्चा होईल मग राज्यसभेत. गोंधळामुळे अनेकदा सभागृह स्थगित करावे लागले. गोंधळ वाढल्याने नायडू यांनी सभागृह बुधवार सकाळी ९ वाजेपर्यंत स्थगित केले.

दु. ४ वा. लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आणि शेतकरी मुद्यावर चर्चेची मागणी केली. लोकसभेत जय जवान जय किसानच्या घोषणांमध्ये चर्चेऐवजी गोंधळ सुरू होता. तर काँग्रेस संसदीय पक्षाची मंगळवारी बैठक झाली. शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली.

संसदेत व बाहेर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेस तयार- कृषिमंत्री तोमरगोंधळातच कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, सरकार संसदेत आणि बाहेर शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेला तयार आहे. आजच्या प्रश्नकाळातही शेतकऱ्यांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. मात्र, विरोधक सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत आहेत.

काँग्रेस खा. अधीर रंजन म्हणाले, आपण ब्रिटिश काळाकडे जात असल्याचे वाटतेलोकसभेत काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, आंदोलनात १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. असे वाटते की, आपण पुन्हा ब्रिटिश काळात जात आहोत. यावर लोकसभा सभापतींनी सांगितले की, शेतकरी संघटनांसोबत सरकार चर्चा करत आहे.

- संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत ठरला आहे. - सूत्रांनुसार अधिवेशन दोन दिवस आधी स्थगित होऊ शकते. - अधिवेशनाचा दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल. - राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होईल. - लोकसभेत दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चर्चा होईल.

बातम्या आणखी आहेत...