आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • It Could Happen More Than Twice Next Year JEE Main, NEET 2021 Will Not Be Canceled: Education Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:पुढील वर्षी दोनपेक्षा जास्त वेळा होऊ शकते जेईई मेन, नीट-2021 रद्द होणार नाही : शिक्षणमंत्री

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आगामी परीक्षा आणि तिच्याशी संबंधित प्रश्नांवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसोबत गुरुवारी चर्चा केली. कोरोना महामारीमुळे २०२१ ची परीक्षा रद्द होणार का, या प्रश्नावर मंत्री म्हणाले, ‘परीक्षा रद्द करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. नीट (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-२०२१) घेतली जाईल. ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या शक्यता मंत्रालय पडताळून पाहत आहे.’

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक पुढे म्हणाले की, ‘कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ताणतणावात आणखी वाढ झाली आहे. तो काही अंशी कमी करता यावा म्हणून इंजिनिअरिंगसाठी घेतल्य जाणाऱ्या जेईई मेन (संयुक्त प्रवेश परीक्षा-२०२१) पुढील वर्षापासून दोनपेक्षा जास्त वेळा घेण्याचा विचार सुरू आहे. तिच्या पहिल्या टप्प्यातील तारखांची लवकरच घोषणा केली जाईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser