आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Doesn't Matter How Long The Antibody Lasts After Vaccination ... T cells Have The Ability To Fight Corona In Memory

भास्कर नॉलेज:लस घेतल्यानंतर अँटिबॉडी किती दिवस राहते, यामुळे काही फरक पडत नाही... टी-सेल्सच्या मेमरीत येते कोरोनाशी लढण्याची ताकद

नवी दिल्ली / पवनकुमार6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात कोविड लसीकरण वेगाने होत आहे आणि त्यासोबत एक चर्चा जोरात आहे. अलीकडेच काही वृत्तांत म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग होऊन बरे झालेल्यांत आजाराशी लढणाऱ्या अँटिबॉडीचे प्रमाण लसीकरणानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीपेक्षा जास्त असते. एवढेच नाही तर संसर्गानंतर निर्मित अँटिबॉडी जास्त दिवस राहते. लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न चिंताजनक वाटतो. पण ‘भास्कर’ने तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी एकमताने म्हटले की, शरीरात अँटिबॉडीच्या प्रमाणाच्या आधारे संसर्गाचा धोका मोजला जाऊ शकत नाही. एवढेच नाही तर अँटिबॉडी जास्त दिवस राहिली तरीही फरक पडत नाही. लसीकरण किंवा संसर्गानंतरही शरीराच्या टी-सेल्सच्या मेमरीत अँटिबॉडी तयार करणारे घटक येतात. भविष्यात संसर्गाच्या स्थितीत टी-सेल्स त्वरित अँटिबॉडी तयार करू लागतात. तज्ज्ञांच्या मते, अनेक देशांत नैसर्गिक संसर्ग आणि लस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीवर अभ्यास झाला आहे. पण कुठलाही ठोस निष्कर्ष निघाला नाही.

वैज्ञानिकांची टिप्पणी-महामारी फक्त दीड वर्ष जुनी, संसर्ग आणि लसीमुळे तयार होणाऱ्या अँटिबॉडीच्या तुलनात्मक अभ्यासाचा ठोस निष्कर्ष नाही...टी-सेल्सची मेमरी दोन्हींपासून तयार होते

लसीची अँटिबॉडी विशेष व्हेरिएंटविरुद्ध तयार होते
एम्सच्या मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. नीरज निश्चल म्हणाले की, कोणाची अँटिबॉडी दीर्घकाळापर्यंत राहते हे सध्या स्पष्ट नाही. संसर्गानंतर तयार होणारी अँटिबॉडी जास्त गुणकारी आहे. कारण ही अँटिबॉडी अनेक प्रकारच्या अँटिजनविरुद्ध बनते. लस एखाद्या विशेष व्हेरिएंटविरुद्ध जास्त प्रभावी असते.

इम्युनिटीचा अवधी लस आणि विषाणू व्हेरिएंटवर अवलंबून
नॅशनल कोविड टेक्निकल टास्क फोर्सचे सदस्य प्रो.के. श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, संसर्गात व्हायरल लोड जास्त असल्यास प्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत राहते. एखाद्याला संसर्ग झाला व त्याने लसही घेतली तरी एक वर्षापेक्षा जास्त प्रतिकारशक्ती राहील. प्रतिकारशक्तीचा अवधी लस व विषाणूच्या व्हेरिएंटवरही अवलंबून असतो.

टी-सेल्स इम्युनिटी राहिल्यास संसर्गाची लक्षणे सौम्य
आयसीएमआरचे माजी वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, संसर्ग संपल्यानंतर अँटिबॉडी संपते. भविष्यात संसर्ग झाल्यास टी-सेल्सची मेमरी कार्यरत होऊन अँटिबॉडी बनवते. टी-सेल्स इम्युनिटीनंतरही संसर्गाचा धोका राहील, लक्षणे कमी राहतील. ज्येष्ठ-कमकुवत प्रतिकारक्षमता असलेल्यांना बहुधा बूस्टर डोसची गरज पडू शकते.

अँटिबॉडी राहिली किंवा कमी झाली तरी फरक पडत नाही
आयसीएमआरचे वैज्ञानिक डॉ.समीरण पांडा म्हणाले की, अँटिबॉडी कमी झाल्याने फरक पडत नाही. अँटिबॉडी तयार झाल्यावर ज्या मेमरी सेल्स निर्माण होतात त्यात रोग प्रतिकारशक्ती राहते. ती कधीपर्यंत राहते हे स्पष्ट नाही. कारण आजार दीड वर्षच जुना आहे. ती अनेक वर्षांपर्यंत राहू शकते हे इतर विषाणूंच्या अनुभवावरून दिसते.

बातम्या आणखी आहेत...