आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादच्या शाही इमामांचे वक्तव्य:महिलांना निवडणुकीत तिकीट देणे इस्लामच्या विरोधात

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होईल. याच्या एक दिवस आधी येथील जामा मशिदीच्या शाही इमामांनी महिलांना तिकीट देण्यावर आक्षेप व्यक्त केला. शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दिकी म्हणाले, निवडणुकीत महिलांना तिकीट देणे इस्लामविरुद्ध आहे. हा इस्लामला कमकुवत करण्याचा कट आहे. वृत्तसंस्थेला इमाम यांनी प्रश्न विचारला की, महिलांना तिकीट द्यायला पुरुष शिल्लक नाहीत का? तुम्ही आपल्या स्त्रीयांना एमएलए, नगरसेविका बनवत असाल तर आम्ही हिजाब सुरक्षित ठेवू शकत नाहीत. तुमच्या महिला विधानसभा, लोकसभेत येतात असे लोक म्हणतील.

बातम्या आणखी आहेत...