आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • It Is Difficult To Revoke A License If You Pay More Than The Fixed Rate For Drugs; Only Fines Can Be Levied In Such Cases, There Is No Rule To Revoke The License

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:औषधांसाठी निश्चित दरापेक्षा जास्त पैसे घेतल्यास परवाना रद्द करणे कठीण; अशा वेळी केवळ दंड आकारता येईल, परवाना रद्द करण्याचा नियमच नाही

पवन कुमार| नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डानेही (डीटीएबी) अशा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यास नकार दिला होता

राष्ट्रीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणाकडून(एनपीपीए) औषधाचे दर निश्चित केल्यानंतरही औषधी कंपन्यांकडून यापेक्षा जास्त दर आकारले गेल्यास या कंपन्यांचा परवाना रद्द करता येणार नाही. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स नियमांमध्ये परवाना रद्द करण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे ड्रग्ज कन्सल्टेटिव्ह कमिटीने म्हटले आहे. यापूर्वी ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डानेही (डीटीएबी) अशा कंपन्यांचा परवाना रद्द करण्यास नकार दिला होता.

औषधी कंपन्यांकडून निश्चित दरापेक्षा जास्त पैसे घेतले गेल्यास किंवा स्वत:च औषधाचे दर ठरवल्यास अशा कंपन्यांकडून व्याजासह दंड आकारण्यात यावा. तसेच दंड न भरल्यास परवाना रद्द करण्याचा विचार करावा, असे संसदेच्या स्थायी समितीने आपल्या ५४ व्या अहवालात म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयानेही आवश्यक असल्यास ड्रग्ज प्राइस कंट्रोल ऑर्डर (डीपीसीओ) आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स नियमांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. एनपीपीएनुसार, दर निश्चित केल्यानंतरही जास्त पैसे घेणाऱ्या कंपन्यांना दंड वसूल करण्यासाठी २०८३ नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मार्च २०२० पर्यंत सहा हजार ४०६ कोटींपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे.

एनपीपीए असे ठरवते दर

आधीच बाजारात असलेले औषध एखाद्या कंपनीला पुन्हा आणायचे असल्यास याचे दर एनपीपीएकडून ठरवले जातात. सारखे घटक असलेल्या पाच औषधी कंपन्यांचे सरासरी दर काढून नवीन कंपनीच्या औषधाचे दर निश्चित केले जातात. काही कंपन्या एनपीपीएला न सांगता परस्पर दर ठरवतात. नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिनचे दरही एनपीपीएकडून ठरवले जातात.