आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • It Is Impossible For Nitish To Get A Double Digit Seat On His Own, Strongly Criticized By RJD Leader Tejaswi Yadav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक:नितीश यांना स्वबळावर दोन अंकी जागा मिळणे अशक्य, राजद नेते तेजस्वी यादव यांची जोरदार टीका

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारमधील विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापू लागले आ

बिहारमधील विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दाेन अंकी जागा मिळणेही अशक्य आहे, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

वास्तविक यादव यांनी महाआघाडीच्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचे सहकारी म्हणून काम पाहिले हाेते. तेजस्वी म्हणाले, त्यांचा चेहरा (नितीश कुमार) आगामी निवडणुकीत पक्षाला दाेन अंकी जागा मिळवून देऊ शकत नाही. हा माझा दावा आणि आव्हान असल्याचे यादव ट्विट केले.

नितीश कुमार यांनी साेमवारी व्हर्च्युअल रॅलीला मार्गदर्शन केले हाेते. त्यात त्यांनी लालू प्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली हाेती. बिहारमध्ये १५ वर्षे ‘पती-पत्नी राज’ (लालू-राबडींची सत्ता) हाेते. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला हाेता, अशी टीका या सभेतून नितीश कुमार यांनी केली हाेती. कुमार यांनी नाेव्हेंबर २००५ मध्ये राज्यात सत्तापालट घडवून आणण्यात यश मिळवले.

एवढा पैसा आला काेठून?

काही लाेकांनी आयुष्यात काहीच कामे केलेली नाहीत. असे असताना त्यांच्याकडे (तेजस्वी) अमाप पैसा आहे. त्यांनी हा पैसा काेठून आणला? जनतेला त्यांनी हे सांगायला हवे. परंतु ते सांगण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. म्हणूनच त्यांच्यापासून दूर हाेण्याचा निर्णय मी घेतला हाेता, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

भाजपसाेबत बहुमत

२०१० च्या निवडणुकीत राज्यात राजकीय चित्र पालटले हाेते. जदयू व भाजप यांच्या आघाडीला गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले हाेते. २४३ सदस्यीय विधानसभेत चार पंचमांश जागांवर ही आघाडी विजयी झाली हाेती.

आघाडीत लाेजपला आता जागा नाही

बिहारमध्ये नितीश कुमार व जदयूबद्दल सातत्याने जाेरदार वक्तव्ये करणाऱ्या लाेकजनशक्ती पार्टीच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत. आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे लाेकजनशक्ती पार्टीला स्थान मिळणे अशक्य आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु लाेजपने महाआघाडीत सहभागी हाेण्याची इच्छा अद्याप पर्यंत जाहीरपणे व्यक्त केलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.