आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेनाकाळात लग्नांचाही ट्रेंड बदलला आहे. सरकारी गाइडलाइनमुळे मर्यादित पाहुण्यांची नवी परंपरा रुजत आहे. ५०, १०० या २०० पाहुणेच बोलावण्याच्या नियमांमुळे यजमानांना नव्या योजना आखाव्या लागत आहेत. सर्व पाहुण्यांना एकत्र नव्हे तर वेगवेगळ्या दिवशी बोलावून विविध विधींचे निमंत्रण दिले जात आहे. यासाठी लग्नपत्रिकाही वेगळ्या छापल्या जात आहेत. यात वरात व पंगतीसाठी वेगवेगळी निमंत्रणे आहेत. जेणेकरून वेगवगेळ्या कार्यक्रमांत सर्वांची उपस्थिती असावी आणि लग्नही पारंपरिक पद्धतीने लागावे. आता लग्नाचे थेट प्रक्षेपण केले जात अाहे. जे नातेवाईक विवाह सोहळ्याला येऊ शकणार नाहीत त्यांना घरबसल्या लग्न पाहण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रिकेवर लाइव्ह लग्नाची लिंक व पासवर्डही छापला जात आहे.
वेडिंग प्लॅनरनुसार, कोरोनामुळे पाहुण्यांची संख्या मर्यादित असली तरी लग्नसाेहळा तितक्याच थाटात व्हावा म्हणून नवनवीन आयडिया पुढे येत आहेत. त्यातून लाइव्ह टेलिकास्टसारखे पर्याय रुजत आहेत. ५०% ते ६०% लाेक याची मागणी करत आहेत. जी कुटुंबे स्थानिक पातळीवर लग्न करत आहेत ती नातेवाइकांसाठी जेवणाची पाकिटे त्यांच्या घरीच पाठवण्याची मागणी करत आहेत.
कार्डवर टॅग: लग्नापेक्षा आरोग्य मोलाचे
> लग्नाला न येणाऱ्या वा प्रकृती बरी नसलेल्यांसाठी त्यांच्या घरी जेवण्याचे पार्सल पाठवले जात आहे. टॅगद्वारे कळवले जात आहे की, ‘लग्नापेक्षा तुमचे आरोग्य महत्त्वाचे आहे. ’ जेवण घरी पोहोचवण्याची जबाबदारी केटरर्सना दिली जात आहे.
बदलता ट्रेंड : ६०% लग्नांसाठी ‘लाइव्ह टेलिकास्ट’च्या ऑर्डर्स
> लाइव्ह स्ट्रीमिंग डिव्हाइसला कॅमेरा जोडून लग्नाचे थेट प्रक्षेपण होते. लिंक व पासवर्ड दिला जातो. ६० % लग्नांत अशा ऑर्डर येत आहेत. - कमलेश साेनगरा, सिनेमॅटाेग्राफर
> आता एकाच लग्नासाठी २-२ पत्रिका छापल्या जात आहेत. त्यामध्ये आयोजनेही वेगवेगळी लिहिली जात आहेत. वेगळेवेगळे टॅग करून जेवणावळीच्या थाळीचाही उल्लेख केला जातोय . - राकेश पुरी, ग्राफिक्स डिझायनर
> घरी जेवणाची पाकिटे पाठवण्याची परंपरा काेराेनाकाळात सुरू झाली आहे. केटरिंगच्या पॅकेजसोबत घरोघरी जेवण पोहोचवण्याचीही जबाबदारी दिली जातेय. - साेहन सिंह, केटरर्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.