आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:ताजमहालाचा इतिहास निश्चित करणे काेर्टाचे काम नाही : काेर्ट

दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताजमहालाच्या इतिहासाबद्दल जुन्या पुस्तकांमधील माहिती चुकीची असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इतिहासातील पुस्तकांतून ताजमहालाबद्दलच्या इतिहासाची चुकीची माहिती हटवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली हाेती.

न्यायमूमर्ती एम.आर. शहा व सी.टी. रविकुमार यांच्या पीठाने सुनावणी करण्यास नकार दिला. ताजमहालाचा काय इतिहास आहे हे निश्चित करण्याचे काम न्यायालयाचे नाही. याचिकाकर्त्याला वाटत असल्यास त्यांनी आपल्या मागणीवर पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे निवेदन द्यावे. सुरजितसिंह यादव यांनी जनहित याचिकेतून एक दावा केला हाेता. त्यात १७ वर्षांत ताजमहाल बनवण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे, असे म्हटले हाेते.

बातम्या आणखी आहेत...