आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजीसीचा मसुदा जाहीर:अभिमतचा दर्जा मिळवणे आता कठीण, नव्या नियमांचा समावेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात यापुढे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवणे साेपे राहिलेले नाही. गुणवत्ता टिकवण्यासाठी यूजीसीने अनेक नवे नियम लागू केले आहेत. यूजीसीने शुक्रवारी आपल्या नव्या नियमावली अध्यादेशाचा मसुदा जाहीर केला आहे. अध्यक्ष एम. जगदीशकुमार म्हणाले, किमान पाच विभागांसह मल्टी डिसिप्लिनरी व्यवस्था असलेल्या संस्थांनाच अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळू शकेल. सलग तीन वर्षे किमान ३.०१ सीजीपीएसाेबत नॅकची ए श्रेणी असावी. दाेन तृतीयांश अभ्यासक्रमांना सलग तीन वर्षे एनबीएकडून अधिस्वीकृती किंवा सलग तीन वर्षे एनआयआरएफच्या विषयात विशेष श्रेणी हवी.

बातम्या आणखी आहेत...