आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात माेठे विमानवाहू जहाज आयएनएस विराट महिनाअखेरीस सेवानिवृत्त हाेणार आहे. येथील शिप ब्रेकिंग यार्डमध्ये ते पाेहाेचेल. या युद्धनाैकेला गुजरातच्या भावनगर येथील श्रीराम ग्रीन शिप रिसायकलिंग इंडस्ट्रीजने खरेदी केले आहे. कंपनीचे मुकेश पटेल म्हणाले, युद्धनाैका आयएनएस विराटच्या भंगारापासून तयार केलेल्या दुचाकी बाजारात येऊ शकतात. देशातील दाेन दुचाकी उत्पादकांनी त्यात रस दाखवला आहे. दोन्ही कंपन्या युद्धनाैका खरेदी करू इच्छितात. त्यासंबंधी विचार-विनिमय देखील केला जात आहे. या आधी आयएनएस विक्रांतची मुंबईत माेडणी करण्यात आली हाेती. त्यात लावण्यात आलेल्या स्टीलसह अनेक धातूंचा वापर करून बजाज कंपनीने एक दुचाकी बाजारात उतरवली हाेती. तेव्हा बाजारातून देखील त्यावर चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. ऑनलाइन लिलावात ही युद्धनाैका खरेदी केल्यानंतर श्रीराम ग्रीन शिप रिसायकलिंग इंडस्ट्रीजने पैसा जमा केला हाेता.
त्यानंतर कंपनीला अंतिम खरेदीदार म्हणून डिलिव्हरी ऑर्डर देखील मिळाली हाेती. या महिन्याच्या सुरुवातीला नाैदलाच्या डाॅकयार्ड-मुंबईहून आयएनएस विराटला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली हाेती. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात एका बाेटीच्या मदतीने युद्धनाैकेला अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये आणले जाईल.
सेंटर क्लास एअरक्राफ्ट कॅरियर १९५९ मध्ये ब्रिटनच्या राॅयल नेव्हीसाठी त्याची निर्मिती करण्यात आली हाेती. हे जहाज १९८२ च्या फाेकलँड युद्धादरम्यान ब्रिटिश राॅयल नेव्हीमध्ये सक्रिय हाेते. १९८७ मध्ये ब्रिटिश नाैदलाने ही युद्धनाैका निवृत्त केली हाेती. त्यानंतर भारतीय नाैदलाने त्याची खरेदी केली हाेती. १२ मे १९८७ राेजी युद्धनाैकेला अधिकृतरीत्या भारतीय नाैदलात समाविष्ट करण्यात आले हाेते. ६ मार्च २०१७ राेजी नाैदलाने अधिकृतपणे आयएनएस विराटला सेवानिवृत्त केले.
३० वर्षांत नौदलाच्या कोणत्याही युद्धमाेहिमेत सक्रिय नव्हते
आयएनएस विराट भारतीय नौदलाच्या कोणत्याही युद्ध मोहिमेत सक्रिय राहिले नव्हते. ३० वर्षांपासून ते युद्धापासून दूर ठेवण्यात आले. ते विमान वाहून नेण्यासाठी सक्षम हाेते. आयएनएस विराटने २३ जुलै २०१६ राेजी आपल्या इंजिनाद्वारे अखेरची समुद्र सफर केली हाेती. त्यानंतर नाैदलाने सर्व शस्त्रांना निष्क्रिय केले हाेते. ६ मार्च २०१७ राेजी आयएनएस विराटला अधिकृतपणे निराेप देण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.