आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​सर्विस चार्जवर केंद्र कठोर:ग्राहकांना सेवा शुल्क आकारणे चुकीचे, सरकारने रेस्टॉरंट व हॉटेल मालकांचे कान टोचले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने (DOCA) गुरुवारी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियासोबत (NRAI) झालेल्या एका बैठकीत ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल न करण्याचे निर्देश दिलेत. विभागाने ग्राहकांना सेवा शुल्क आकारणे पूर्णतः चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार यासंबंधीचे नियम लवकरच जारी करणार आहे. त्याचा देशभरातील खवय्यांना मोठा लाभ होईल.

सर्व्हिस चार्ज म्हणजे काय?

तुम्ही एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी काही पैसे द्यावे लागतात. त्याला सर्विस चार्ज म्हणजे सेवा शुल्क म्हटले जाते. म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढणे व अन्य सेवांसाठी ग्राहकांकडून सर्विस चार्च घेतले जाते. ग्राहकही या प्रकरणी कोणताही सवाल न करता सर्विस चार्जसह पेमेंट करतात. तथापि, हे शुल्क सेवा घेताना नव्हे तर केवळ व्यवहाराच्या वेळीच आकारले जाते

बिलाच्या काही टक्के आकारले जाते सेवा शुल्क

तुमच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलाच्या तळाशी सेवा शुल्क नमूद केले असते. हे सहसा तुमच्या बिलाच्या काही टक्के असू शकते. बहुतांशवेळा ते 5% असते. म्हणजेच, जर तुमचे बिल 1,000 रुपये असेल, तर हे 5% सेवा शुल्क धरून ते 1,050 रुपये होते.

बातम्या आणखी आहेत...