आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण:राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा कलम लावणे चुकीचे, त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, यावरून मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर बुधवारी उच्च न्यायालायने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दाम्पत्यानी केला होता. तसेच, यादरम्यान मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला 11 दिवस कोठडीत काढावे लागले. मात्र, याप्रकरणात राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. त्यांच्यावरील राजद्रोहाचे आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे राजद्रोहप्रकरणी राणा दाम्पत्याला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी न्यायालयाने त्यांच्यावर कठोर अटी लादल्या आहेत. तसेच, या अटींचे उल्लंघन केल्यास पुन्हा कारवाई होईल, असेही बजावले आहे.

या 4 अटींचे पालन करणे राणा दाम्पत्याला बंधनकारक

  • राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
  • अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
  • पुराव्यांशी छेडछाड करू नये
  • या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही

नवनीत राणा दिल्लीत जाण्याची शक्यता
जामीनानंतर कालच नवनीत राणा आणि रवी राणा यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर छातीत त्रास होत असल्याने नवनीत राणांना थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अजूनही लिलावती रुग्णालयात उचपार सुरू आहेत. तुरुंग प्रशासनाने वेळीच नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल न केल्याने त्यांची तब्येत बिघडली, असा आरोप राणांच्या वकिलांनी केला आहे. यावरून किरीट सोमय्या यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, नवनीत राणा आपली तब्येत बरी होताच दिल्लीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकार, पोलिस व तुरुंग प्रशासनाविरोधात दिल्लीत त्या तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा अध्यक्षांकडे यापुर्वीच त्यांनी राज्य सरकार व मुंबई पोलिसांची तक्रार केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...