आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:आयटी प्रोफेशनल्सना कायम वर्क फ्रॉम होम करण्याची सूट, रजिस्ट्रेशन व डेली रिपोर्टिंगचीही गरज नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओएसपी कंपन्यांसाठी नियमात सूट, पायाभूत सुविधा शेअर करू शकतील कर्मचारी

सरकारने बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) व आयटी उद्योगांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार वर्क फ्रॉम होमच्या नियमात सूट देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरातून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. नव्या नियमामुळे अन्य सेवा प्रदात्यांना घरांतून काम आणि कोठूनही काम करण्यासाठी अनुकूल वातावरण असेल. यासाठी प्रोफेशनल्सना वेळोवेळी रिर्पोटिंग व अन्य दुसरी बंधने हटविण्यात आली आहेत. नव्या नियमानुसार विस्तारित एजंट/ रिमोट एजंटच्या स्थितीला (वर्क फ्रॉम होम/ एनिव्हेअर) काही अटीवर मंजुरी दिली आहे. घरात एजंटला ओसएपी केंद्राचा रिमोट एजंट मानले जाईल व इंटर्नल कनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंटला देशातील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्यास परवानगी असेल. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंगमध्ये ऑपरेट करणेही सोपे जाईल. ओएसपीसाठी नोंदणीची आवश्यकता नाही. डाटाशी संबंधित काम करणाऱ्या बीपीओला ओएसपीच्या नियमाच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

याशिवाय बँक गॅरंटी जमा करणे, स्थिर आयपीची आवश्यकता, नियमितपण रिपोर्टिंग करण्याची अट आणि दंडासंबंधीचे नियम रद्द केले आहेत. अशा प्रकारे घरातून काम करणाऱ्यांना आणि कोठूनही काम करणाऱ्या कंपन्यांना काही मुद्यांचा अडसर येत होता ते सर्व मुद्देही वगळण्यात आले आहेत.

याशिवाय भारतात ओएसपी केंद्रांसाठी नोंदणी प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही. तर या निर्णयामुळे आयटी कंपन्या देशभरात आपले केंद्र वाढवू शकतील. तसेच नवे कर्मचारीही नियुक्त करू शकतील. तसेच शहरात कार्यालये असण्याची गरज नाही. कंपन्या तेथे छोटे कार्यालय काढून काम करू शकतात.

ओएसपी कंपन्या म्हणजे काय, ज्यांना मिळाली सूट
ओएसपी म्हणजे दूरसंचार साधनांचा वापर करून अॅप्लिकेशनवर आधारित सेवा, आयटी सेवा अथवा अन्य प्रकारच्या सेवा देत असतात. अशा प्रकारच्या कंपन्यांना बीपीओ, नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीओ), आयटीईएस आणि कॉल सेंटर म्हटले जाते.

महिला व अर्धवेळ काम करणाऱ्यांना फायदा
- जर घरी काम करणे शक्य असेल तर छोट्या शहरातील लोकांसाठी संधी वाढतील. ते घरूनच काम करतील.
- महिला, आयटी प्रोफेशनल्स घरातून काम करू शकतील.
- शारिरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना उद्योगात काम करता येईल.
- अर्धवेळ कामास प्रोत्साहन मिळेल.