आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सैनिकांच्या चाकू-काठ्यांना प्रत्युत्तर:ITBP च्या जवानांना मार्शल आर्ट्सचे धडे, गलवानमध्ये ड्रॅगगने याच शस्त्रांनी केला होता हल्ला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
15 जून रोजी गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. अमेरिकेच्या एका न्यूज रिपोर्टनुसार, या घटनेत चीनचे तब्बल 38 सैनिक मारले गेले होते.  - Divya Marathi
15 जून रोजी गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. अमेरिकेच्या एका न्यूज रिपोर्टनुसार, या घटनेत चीनचे तब्बल 38 सैनिक मारले गेले होते. 

चीन सीमेवर तैनात ITBPच्या जवानांना आता शस्त्राविना लढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सलग 44 आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या विशेष प्रशिक्षण मोहिमेत त्यांना मार्शल आर्ट्सच्या 15 स्टेप्स शिकवण्यात येणार आहेत. यामुळे त्यांना बर्फाळ वादळ, हिमस्खलन व ऑक्सिजनच्या तुटवड्यासारख्या विविध प्रतिकूल परिस्थितींचा चपखल सामना करता येईल.

सीमेवर 90 दिवसांहून अधिक तैनाती नाही

यासंबंधीच्या वृत्तानुसार, सैनिकांना ट्रेनिंगमध्ये ज्यूडो, कराटे, क्राव्ह मागा व जपानी मार्शल आर्ट शिकवण्यात येईल. याचा मुख्य हेतू चाकू किंवा काठ्यांनी सूसज्ज चिनी सैनिकांचा सामना करण्याचा आहे. दुसरीकडे, ट्रेनिंगनंतर जवानांना सीमाभागातील पोस्टवर केवळ 90 दिवसांसाठी तैनात करण्याचीही योजना आहे.

ITBP ने तयार केली होती अन-आर्म्ड कॉम्बॅट स्ट्रॅटजी

गलवान घाटीतील हिंसक चकमकीनंतर 2021मध्ये ITBPचे तत्कालीन महासंचालक संजय अरोरा यांनी अन-आर्म्ड कॉम्बॅट स्ट्रॅटजी तयार करण्याचे निर्देश दिले होते. भारत-चीनमधील करारानुसार, दोन्ही देशांतील सीमेवर बंदुकीचा वापर करता येत नाही. त्यामुळे या सीमेवर सैनिक लाठ्याकाठ्या घेऊनच सीमेची निगराणी करतात.

भारत-चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 23 डिफरिंग परसेप्शन क्षेत्र आहेत. बहुतांशवेळा याच भागात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांपुढे उभे टाकतात.
भारत-चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 23 डिफरिंग परसेप्शन क्षेत्र आहेत. बहुतांशवेळा याच भागात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांपुढे उभे टाकतात.

गलवान घाटीत भारताचे 20, चीनचे 38 सैनिक शहीद

चीनने एप्रिल 2020 मध्ये पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या नावाखाली शेकडो सैनिक गोळा केले होते. त्यानंतर अनेक ठिकाणखी घुसखोरीच्या घटना घडल्या होत्या. भारत सरकारनेही या भागात चीनच्या बरोबरीने सैन्य तैनात केले होते. त्यानंतर स्थिती एवढी बिघडली की तब्बल 4 दशकांनंतर चीनच्या सीमेवर गोळीबार झाला होता. त्यातच 15 जून रोजी गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

अमेरिकन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'ने आपल्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमध्ये या चकमकीत चीनचे तब्बल 38 सैनिक ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर चीननेही या घटनेत आपले काही सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले होते. पण त्याने याचा आकडा अद्याप स्पष्ट केला नाही.

बातम्या आणखी आहेत...