आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ITBP Jawans Carried The Woman On A Stretcher And Walked 40 Km Through The Flooded Area

पिथौरागड:महिलेला स्ट्रेचरवर घेऊन पूरग्रस्त भागातून 40 किमी पायी गेले आयटीबीपीचे जवान

पिथौरागड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 ऑगस्टला ही महिला डोंगरावरून पडली होती, अपघातात तिचा पाय मोडला होता

भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांनी शनिवारी उत्तराखंडातील लास्पा गावातून एका जखमी महिलेची सुटका केली. त्यांनी पाऊस सुरू असताना १५ तासांत स्ट्रेचरवरून महिलेला रस्त्यापर्यंत आणले आणि तेथून तिला रुग्णालयात नेण्यात आले. यासाठी जवानांना ४० किमी पायी चालावे लागले.

आयटीबीपीनुसार १४ व्या बटालियनच्या जवानांच्या टीममध्ये २५ जवान होते. त्यांनी पिथौरागडच्या मुनस्यारीतील सीमेवरील गाव लास्पा येथून महिलेची सुटका केली. २० ऑगस्टला ही महिला डोंगरावरून पडली होती. अपघातात तिचा पाय मोडला होता. वाईट हवामानामुळे घटनेच्या दोन दिवसांनंतरही हेलिकॉप्टर पोहोचू शकले नाही. तिची प्रकृती गंभीर होत चालली होती. जवान २२ किमी दूर महिलेच्या गावात पोहोचले. वाहत्या नद्या, भूस्खलन व घसरण यांचा सामना करत जवानांनी १५ तासांत सुमारे ४० किमींचा प्रवास करून महिलेला स्ट्रेचरवरून रस्त्यापर्यंत आणले आणि रुग्णालयात दाखल केले.

येथून महिलेची सुटका केली. २० ऑगस्टला ही महिला डोंगरावरून पडली होती. अपघातात तिचा पाय मोडला होता. वाईट हवामानामुळे घटनेच्या दोन दिवसांनंतरही हेलिकॉप्टर पोहोचू शकले नाही. तिची प्रकृती गंभीर होत चालली होती. जवान २२ किमी दूर महिलेच्या गावात पोहोचले. वाहत्या नद्या, भूस्खलन व घसरण यांचा सामना करत जवानांनी १५ तासांत सुमारे ४० किमींचा प्रवास करून महिलेला स्ट्रेचरवरून रस्त्यापर्यंत आणले आणि रुग्णालयात दाखल केले.