- Marathi News
- National
- ITBP Jawans Practice Yoga On LOC; Yoga With The Jammu And Kashmir Canine Warriors
18 फोटोंमध्ये पाहा योग दिन:ITBP जवानांचा LOC वर योगाभ्यास; जम्मुत कॅनाइन वॉरियर्सचा जवानांसोबत योगा
भारतासोबतच जगभरात आज ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. सिक्कीमपासून दिल्लीपर्यंत देशातील 75 ऐतिहासिक केंद्रांवर मंत्री, मुले, महिला, लष्कराचे जवान योग करत आहेत. बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये योगा करताना सैनिकांचे फोटो समोर येत आहेत. पाहुयात देशाच्या विविध भागातील काही छायाचित्रे...
इंडो-तिबेट बॉर्डरवर लडाखमध्ये पोलिस जवानांनी 17,000 फूट उंचीवर योगासने केली.
हा फोटो जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील आहे, जिथे भारतीय सैन्यातील सैनिक आणि कॅनाइन वॉरियर्स योगासने करत होते.
त्यागराज स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहभागी झाले आहेत. दोघांनी लोकांसोबत योगासने केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात योगासने केली. योग ही भारताने मानवतेला दिलेली देणगी असल्याचे ते म्हणाले.
हिमाचल प्रदेशातील कांगडा किल्ल्यावर योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इतरांसोबत योगासने केली.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नोएडा स्टेडियममध्ये योगाभ्यास केला. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथील पंचमहालचे हे छायाचित्र आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी योगा केला.
ITBP 33 बटालियनच्या कर्मचाऱ्यांनी आसाममधील गुवाहाटी येथील लचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर योगासने केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंजाबमध्येही लोकांनी योगासने केली. हा फोटो अमृतसरच्या दुर्गियाना तीरथ येथील गोलबाग मैदानाचा आहे.
हा फोटो अरुणाचल प्रदेशातील लोहितपूरचा आहे, जिथे ITBP च्या जवानांनी ATS मध्ये योगा केला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन येथे गंगेच्या काठावर योगासने केली. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ योगा करताना सैनिक. सुमारे 450 सैनिक त्यात सामील झाले.
हा फोटो छत्तीसगडमधील नारायणपूरचा आहे, जिथे अनेक ITBP जवानांनी एकत्र योगा केला.
हा फोटो हिमाचल प्रदेशचा आहे, जिथे ITBP च्या जवानांनी 16,500 फूट उंचीवर योगा केला.
उत्तराखंडमध्ये योगगुरू रामदेव यांनी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात योगासने केली. या कार्यक्रमात मुले आणि इतर अनेक लोक देखील सहभागी होतात.
सिक्कीममध्ये बर्फात ITBP जवान योग करत आहेत. त्यांनी 17,000 फूट उंचीवर एकत्र योगासने केली.ITBP चे सेंट्रल स्की टीम हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास येथे बर्फात 14,000 फूट उंचीवर योग करत आहे.
ITBP चे सेंट्रल स्की टीम हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास येथे बर्फात 14,000 फूट उंचीवर योग करत आहे.
.जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील विक्रम पार्क मैदानावर लष्कराने विशेष योग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सैनिक, अधिकारी यांच्यासह घोडेही सहभागी झाले होते.