आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक, VIDEO:ऑटो-बाइकस्वारांना चिरडले; बस चालकासह 2 ठार, 6 जखमी

जबलपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूरमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मोठा अपघात झाला. येथे मेट्रो बस चालवणाऱ्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर बस ऑटो, दुचाकी आणि स्कूटी वाहनांना चिरडत पुढे गेली. अपघातात चालक हरदेव पाल याचा जागीच तर जखमी झालेल्या वृद्धाचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोन मुलांसह 5 जखमी रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आधरताल येथून राणीतालकडे निघाली होती. बस दामोह नाक्याजवळ पोहोचली होती. तेव्हा हा अपघात झाला.

ड्रायव्हिंग सीटवर बेशुद्धावस्थेत आढळला ड्रायव्हर
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तेथे पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमींना रुग्णालयात नेले होते. बस चालक हरदेव पाल हा त्याच्या सीटवर बेशुद्ध पडला होता. हरदेवला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तेथे गंभीर जखमी लड्डू प्रसाद गौर (वय 60) यांचा सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटना सीसीटीव्हीत कैद
ही संपूर्ण घटना चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये बस वाहनांना धडकताना दिसत आहे. थोडे अंतर गेल्यावर बस फूटपाथला धडकून थांबते. घटना इतक्या वेगाने घडली की कुणालाही तेथून निघण्याची संधी मिळाली नाही.

बातम्या आणखी आहेत...