आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Jagadeep Dhankhar Vs Mamata Banerjee | West Bengal Post Poll Violence, West Bengal Election Violence, WB Governor Jadeep Dhankhar, CM Mamata Banerjee, Post Poll Violence

मंत्रिमंडळाच्या शपथविधीतही बोलले राज्यपाल:'बंगालमध्ये संविधानाचा अंत; मला रात्री हिंसेच्या बातम्या मिळतात, सकाळी सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले जाते'

कोलकाताएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीत सुद्धा राज्यपालांनी बोलून दाखवले होते

बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या 43 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच पाउले उचलताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहून, सरकारला हिंसाचार हवा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीवरुन असे दिसत आहे की, राज्यात संविधानाचा अंत झाला आहे. मला रात्री राज्यात हिंसा घडल्याच्या बातम्या मिळता, पण सकाळी सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले जाते.'

5 मे रोजी ममता बॅनर्जींचा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यातही राज्यपालांनी बंगालमधील हिंसेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना अपील केली होती की, राज्यातील हिंसा संपवण्यासाठी लवकरात-लवकर कठोर पाऊले उचलावी. त्यावेळेस ममता म्हणाल्या होत्या की, यापुढे राज्यात नवी व्यवस्था लागू होईल. पण, आज पुन्हा राज्यपालांनी हिंसेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

राज्यपाल काय म्हणाले, वाचा...

 • सरकारमध्ये उत्तरदायित्व दिसले नाही

सरकारने राज्यातील परिस्थिती समजून घ्यावी आणि जनतेच्या मनात विश्वास स्थापन करावा. जे लोक लोकशाही विरोधी काम करत आहेत, अशा लोकांवर सरकारने कडक कारवाई करावी. आतापर्यंत सरकारने कठोर कारवाई केली नाही. सरकारमध्ये उत्तरदायित्व दिसले नाही.

 • मला रिपोर्ट दिली नाही

मी कोलकाता पोलिस, प्रशासन आणि अधिकाऱ्यांना 3 मे रोजी रिपोर्ट मागितली होती. त्याच दिवसी राज्याच्या मुख्य सचिवांना परिस्थिती सुधारण्यासाठी आढावा घेण्यास सांगितले होते. पण, अजूनही माझ्यापर्यंत कोणतीच रिपोर्ट आली नाही. अधिकाऱ्यांनी अॅडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांना रिपोर्ट पाठवली, पण त्यांनी मला ती रिपोर्ट दिली नाही.

 • सरकार आणि पोलिस अधिकारी फक्त हजेरी लावण्यासाठी आले

मला मुख्य सचिवांना फोन करुन बोलवावे लागले. चीफ सेक्रेटरी आणि DGP मला भेटण्यासाठी आले, पण त्यांच्याकडे कुठलीच रिपोर्ट आणि माहिती नव्हती. मला रिपोर्ट का दिली नाही, याचे कारणही त्यांनी मला सांगितले नाही. गृह सचिवांनी आपली ड्युटी का केली नाही. ते दोघे माझ्याकडे फक्त हजेरी लावण्यासाठी आले होते.

 • हेलिकॉप्टर मागितले, पण दिले नाही

मी प्रभावित भागांमध्ये जाण्यासाठी राज्य सरकारला हेलिकॉप्टरची मागणी केली होती. पण, त्यांनी मला हेलिकॉप्टर दिले नाही. मला त्यांनी रायटींगमध्ये याचे कारण सांगायला हवे होते. पण, फक्त तोंडू सांगण्यात आले की, हेलिकॉप्टर खराब आहे. राज्याच्या संविधानिक प्रमुखाला तुम्ही अशी वागणूक देता ?

 • विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा जीव जातोय

मी तुम्हा सर्वांना आणि विशेषतः माध्यमांना सांगू इच्छितो की, ही निवडणुकीनंतर होणारी ऐतिहासिक हिंसा आहे आणि बंगालने गुन्हेगारी चरित्र स्विकारले आहे. अनेक दिवसांपासून अनेकांचे मृत्यू होत आहेत, बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत. महत्वाचे म्हणजे, विरोधी उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आणि त्यांना मतदान देणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागत आहे.

 • बंगालला संविधानानुसार चालवणे अवघड

मी राज्यातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी राज्य सरकारला अपील करतो की, त्यांनी मला राज्यातील परिस्थिती सांगावी. मला काहीच सांगितले जात नाहीये. सध्या संविधानाच्या विरोधात काम सुरू आहे. मला राज्याला संविधानानुसार चालवणे अवघड जात आहे.

 • बंगालमध्ये निवडणुकीनंतर आतापर्यंत 11 मृत्यू

बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर अनेक जिल्ह्यात भाजप आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, अनेक टिकाणी भाजपचे ऑफिस आणि कार्यकर्त्यांच्या घर आणि दुकानांना जाळण्यात आले आहे. भाजपने याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून, सीबीआयद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

5 मे रोजी राज्यपालांच्या ममतांना सूचना
प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जींना राज्यातील हिंसा बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना दिल्या. यावर ममता म्हणाल्या की, आतापर्यंत राज्यातील व्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, आता मी आल्यानंतर नवीन व्यवस्था लागू करेल.

बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसेवर सीएम आणि राज्यपालांनी व्यक्त केले मत

ममता शपथविधीनंतर म्हणाल्या होत्या की, आमची प्राथमिकता कोविडविरोधातील लढाईला जिंकण्याची आहे. राज्यातील हिंसेवर त्या म्हणाल्या की, राज्यातील जनतेला हिंसा आवडत नाही. हिंसाचार घडवणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. यापुढे हिंसेची घटना घडली नाही पाहिजे. राज्यपाल जगदीश धनखडदेखील म्हणाले- आशा करतो की, ममता बॅनर्जी संविधानाचे पालन करतील. राज्यात कायदा सुव्यवस्था लागू व्हावी.

बातम्या आणखी आहेत...