आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jagadguru Paramahansacharya In Custody, Police Moved To An Unknown Location, Latest News And Update

जगद्गुरु परमहंसाचार्य कोठडीत:पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवले; भगवी वस्त्रे घालून ताजमलाहात जाण्याचा होता प्रयत्न

आग्राएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक ताजमहालात जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अयोध्येतील छावणी तपस्वी आखाड्याचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

परमहंसाचार्यांनी ताजमहालात भगवी वस्त्रे घालून प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यासाठी मंगळवारी ते आग्र्यात पोहोचले होते. भगवी वस्त्रे परिधान करुन एकट्यानेच ताजमहलात जाण्याचा त्यांचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना हिंदुत्ववादी नेते रवी दुबे यांच्या कारमध्ये बसवून ताजमहालाच्या दिशेने नेले. रस्त्यात कैलाश महादेव मंदिराचे महंत निर्मल गिरी यांच्यासह अनेक संतांनी त्यांना घेराव घातला असता त्यांनाही वाहनात बसवण्यात आले. त्यानंतर एडीएम प्रोटोकॉलने प्रतापपुऱ्यात रवी दुबे यांना गाडीतून खाली उतरवले व परमहंसाचार्य यांना घेऊन निघून गेले. आता संतांनी पोलिसांवर परमहंसाचार्यांना अज्ञात स्थळी हलवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिस व परमंहासाचार्यांत तीव्र शाब्दिक चकमक झाली.

अयोध्येच्या छावणी तपस्वी आघाड्याचे जगद्गुरु परमहंसाचार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अयोध्येच्या छावणी तपस्वी आघाड्याचे जगद्गुरु परमहंसाचार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी परमहंसाचार्यांच्या गाडीची झडती घेतली

परमहंसाचार्यांना हॉटेलातून ताजमहालाकडे घेऊन जाता एडीएम व एएसपी राजीव कुमार यांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. परमहंसाचार्यांनी हा भगव्याचा अवमान असल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी हात जोडून त्यांची समजूत काढली. पण, ते कोणत्याही स्थितीत पोलिसांसोबत ताजमहालात जाण्यास तयार झाले नाही.

भगवी वस्त्रे घालून ताजमहालात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या परमहंसाचार्यांपुढे स्थानिक अधिकाऱ्यांनी हात जोडले.
भगवी वस्त्रे घालून ताजमहालात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या परमहंसाचार्यांपुढे स्थानिक अधिकाऱ्यांनी हात जोडले.

अक्षय्य तृतीयेपासून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्बयाची तयारी

परमहंसाचार्यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना म्हटले होते की, अक्षय्य तृतीयेपासून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची तयारी सुरू होईल. याहून चांगला मुहूर्त असू शकत नाही. त्यांनी तेजोमहालयाचे (ताजमहाल) भूमी पूजन व शुद्धीकरण करण्याचाही दावा केला. यासाठी त्यांनी पूर्वेच्या प्रवेशद्वारातून भगवा व ब्रह्मदंडासह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे परमहंसाचार्यांनी यापूर्वीही भगव्या वस्त्रांसह ताजमलाहात प्रवेश नसल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले -भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्ही कोणताही संघर्ष करण्यास तयार आहोत. जनतेला ताजमहालाचा चुकीचा इतिहास सांगण्यात आला. त्यांच्या या विधानानंतर आग्र्यातील हिंदू संघटनांनी तीव्र गदारोळ केला. अनेकजण साधूच्या वेषात ताजमहाल परिसरात पोहोचले होते.

ताजमहालाच्या दिशेने जाताना पोलिसांनी परमहंसाचार्यांच्या वाहनाची झडती घेतली. जगद्गुरुंनी हा भगव्याचा अवमान असल्याचा आरोप केला.
ताजमहालाच्या दिशेने जाताना पोलिसांनी परमहंसाचार्यांच्या वाहनाची झडती घेतली. जगद्गुरुंनी हा भगव्याचा अवमान असल्याचा आरोप केला.

5 मे रोजी ताजमहालावर धर्मसंसद

परमहंसाचार्यांनी 5 मे रोजी ताजमहालावर धर्म संसद बोलावली आहे. यामुळे प्रशासन सतर्क आहे. दुसरीकडे, एसएसपी सुधीर कुमार यांच्यापासून अनेक अधिकारी ईदमुळेही सावधगिरी बाळगत आहेत. संवेदनशील स्थळी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आलेत.

पुरातत्व अधीक्षकांनी मागितली होती माफी

पुरातत्व विभागाने या प्रकरणाच्या तपासानंतर परमहंसाचार्यांना ताजमहालात निमंत्रित केले होते. पुरातत्व अधीक्षक आर.के.पटेल यांनी योग्य समन्वयाअभावी त्यांना रोखण्यात आल्याबद्दल माफी मागितली.

अज्ञात मौलानाविरोधात तक्रार

परमहंसाचार्यांनी सोमवारी अयोध्येतील एका अज्ञात मौलानाविरोधात दहशतवाद पसरवण्याची तक्रार केली होती. त्यांच्या घोषणेनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे ते ते सोमवारी रात्री गुपचूप आग्र्यात आले व दिव्य मराठीशी चर्चा करताना ताजमहालात जाण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यानंतर पोलिसांनी ताजमहाल परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली होती.

बातम्या आणखी आहेत...