आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Rahul Gandhi Bharat Jodo Yatra; Congress Leader Jai Shree Ram; Jai Siyaram; Rss, Bjp, Congress

'जय श्रीराम' नाही, 'जय सियाराम' म्हणा:राहुल गांधींचा BJP-RSSला सल्ला; भाजपचा पलटवार -ते 'इलेक्शन'वाले हिंदू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. शुक्रवारी त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला दिला होता. तसेच जय श्रीराम व जय सियाराममधील फरकही स्पष्ट करून सांगितला होता. आता भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजप नेते शाहनवाज हुसैन या प्रकरणी म्हणाले की, भाजपला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ते निवडणूकवाले हिंदू आहेत. दुसरीकडे, ब्रजेश पाठक यांनीही राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले - राहुल गांधी नाटक बाजारातील नेते आहे. ते कोटावर जानवे घालतात. त्यांना भारतीय संस्कृतीची कोणतीही माहिती नाही. जनतेने नाकारल्यामुळे सध्या ते गल्लोगल्ली फिरत आहेत.

शनिवारी मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत कमलनाथ यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
शनिवारी मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत कमलनाथ यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

राहुल गांधींचे संपूर्ण विधान वाचा

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात होती. तिथे आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले - 'जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो.

जय श्रीराम, यात आपण भगवान रामाचा जयजयकार करतो. पंडितजींनी मला आपल्या भाषणात भाजपचे लोक जय श्रीराम ऐवजी जय सियाराम व हे राम का म्हणत नाहीत हे विचारण्यास सांगितले.

RSS व भाजपचे कार्यकर्ते श्रीरामासारखे आयुष्य जगत नाहीत. रामने कुणावरही अन्याय केला नाही. रामाने समाजाला जोडण्याचे काम केले. आपल्या सर्वांचा आदर केला. पण RSS व भाजपचे लोक भगवान रामाची ही जीवनपद्धती स्वीकारत नाहीत. ते सियाराम व सीताराम म्हणूच शकत नाहीत. कारण, त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही. म्हणजे त्यांची संघटना जयसिया रामची नाही. त्यांच्या संघटनेत सीता येऊच शकत नाही. त्यांनी सीतेला बाहेर ठेवले आहे. हे गोष्ट मला एका पंडिताने रस्त्यात चालताना सांगितली. RSSच्या लोकांनी जय श्रीरामच्या जागी जय सियाराम व हे रामचा वापर केला पाहिजे. त्यांनी सीतेचा अवमान करू नये. गांधीजी हे राम म्हणत होते. त्यांचा नाराच हे राम होता. हे राम म्हणजे काय? हे रामचा अर्थ राम एक जगण्याची पद्धती होती. भगवान राम केवळ एक व्यक्ती नव्हते. जीवन जगण्याचा एक मार्ग होते. प्रेम, बंधूभाव, आदर, तपश्चर्येने त्यांनी संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग दाखवला. गांधीची हे राम म्हणत होते. त्यांच्या मते, भगवान राम आपल्या मनात आहेत. त्याच भावनेने आपल्याला आयुष्य जगायचे आहे. हेच राम आहेत.'

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत कम्प्यूटर बाबाही चालत आहेत. मध्य प्रदेशच्या पूर्ववर्ती काँग्रेस सरकारने त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत कम्प्यूटर बाबाही चालत आहेत. मध्य प्रदेशच्या पूर्ववर्ती काँग्रेस सरकारने त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता.

MPचे गृहमंत्री म्हणाले - राहुल गांधींनी इतिहास वाचावा

MPचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले - राहुल बाबांचे ज्ञान, बाबा-बाबा ब्लॅक शीपसारखे मर्यादित आहे. रामाची सुरुवात श्रीने होते आणि श्रीचा वापर विष्णु पत्नी लक्ष्मी व सीतेसाठी केला जातो. जरा उघडून इतिहास वाचा. दुसरीकडे, शाहनवाज हुसैन यांनी राहुल गांधी इलेक्शन हिंदू असल्याची टीका केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी एका ट्विटद्वारे राहुल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले - भगवान श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधींना भाजपने जय श्रीरामच नव्हे तर जय सियाराम म्हणण्यास मजबूर केले आहे. हा भाजपचा वैचारिक विजय व काँग्रेसच्या विचारधारेचा पराभव आहे. अजून तुम्हाला जय श्री राधाराणी सरकारकी व जय श्रीकृष्णही म्हणायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...