आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरोघरी वापरल्या जाणाऱ्या गुळाची गुणवत्ता चाचणी घेण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) देशातील सर्व राज्यांमधील २४९ जिल्ह्यांमधून ३,०६० नमुने गोळा केले होते. त्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला असून, अनेक राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या गुळाचा निकाल धक्कादायक आहे. अनेक राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या गुळात रसायने मिसळल्याचे समोर आले. अनेक शहरांत हे नमुने अयशस्वी ठरले आहेत. एकूणच देशातील बाजारपेठेतील ३६% गूळ मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरला. पॅकबंद गुळापेक्षा सुटा विकला जाणारा गूळ जास्त खराब आहे. त्यामुळे एफएसएसएआयने पॅकिंगचा गूळ खाण्याचा सल्ला दिला आहे. गुळात तपासलेले सर्व सात घन धातू (जड धातू) सापडले नाहीत. ही चांगली बाब तपासातून समोर आली. हा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.
गुळाच्या व्यवसायात असलेल्या लोकांना जागरूक करण्याबाबत प्रशिक्षणाबाबत एफएसएसएआयने एफएसीआय कृषी मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि सूक्ष्म-लघुउद्योगांचे नियमन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय ऊस संशोधन संस्था (आयआयएसआरआय) आणि राष्ट्रीय साखर संस्था आणि राज्य संशोधन संस्था यांनाही याबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे.
गुळाचे रिपोर्ट कार्ड
-टॉप १० राज्य, तेथे गूळ सर्वाधिक चांगला: त्रिपुरा-१००%, उत्तराखंड ९५%, मेघालय ९०.६%, अंदमान-निकोबार ९०%, आंध्र प्रदेश ८७.५%, जम्मू-काश्मीर ८७.५%, तेलंगण ८७%, सिक्कीम ८५%,आसाम ८३.३%आणि कर्नाटक ८०.६%.
-या राज्यात खराब गूळ : बिहार-१५.६%, पंजाब-१८.५%, अरुणाचल प्रदेश २०%, गोवा २५%, यूपी ३८.५%, मणिपूर ४०%, ओडिशा ४४.४%, गुजरात ४६.६% अन् हिमाचल प्रदेश ५०%.
-या शहरांत १००% शुद्ध : भोपाळ, रांची, दिल्ली, इंदूर, जयपूर, पुणे, सिलिगुडी व वाराणसीत १००% गूळ शुद्ध दिसून येतो. मात्र, गुजरातच्या राजकोट, यूपीचे मेरठ, पंजाबच्या लुधियाना येथील नमुन्यांत शुद्धता १०% सुद्धा आढळून आली नाही.
-दक्षिणमध्ये नियमांचे उल्लंघन कमी : दक्षिण भारतात गूळ तयार करताना अन्न सुरक्षा मानकांची सर्वाधिक काळजी घेतली जाते. तेथे ७८.३% गूळ पॅरामीटर्सवर योग्य असल्याचे दिसून आले. ईशान्येत ५९.४%, पश्चिमेत ५३.३% व उत्तर भारतात सर्वात कमी ४७.२%, अन्न सुरक्षा मानकांची काळजी घेतली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.