आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टघर-लक्झरी गाड्या विकूनही फिटले नाही कर्ज:रिटायर्ड DSPने 2 दिवसांत केली केस बंद, अखेरीस उद्योगपतीने स्वतःला गोळी घातली

रणवीर चौधरी, जयपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजीत एक म्हण आहे -

every suicide has a murderer

म्हणजे प्रत्येक आत्महत्या करणाऱ्याचा एक मारेकरी असतो.

ही केसही तशीच आहे. त्यात एका आत्महत्येला तब्बल 5 जण जबाबदार आहेत.

ही दुखद कहाणी आहे जयपूरच्या पॉश स्वर्णकार कॉलनीत राहणाऱ्या सोनी कुटुंबाची. त्यांचे आनंदी जिवन बंदुकीच्या एका गोळीसोबत संपुष्टात आले.

कुटुंब प्रमुख मनमोहन सोनी 5 जणांनी फसवणूक केल्यामुळे 6.5 कोटी रुपयांच्या कर्जा बुडाले होते.

बँक दरमहा 2 लाख रुपयांचा हप्ता मागत होती.

कर्ज चुकवण्यासाठी त्यांनी मोठ्या उत्साहाने बांधलेले घर विकले.

आपली फेवरेट मर्सिडीज, फोर्ड एंडेव्हर सारख्या 5 लक्झरी कारी विकल्या.

मुलांचे लग्न-शिक्षणासाठी केलेली एफडीही मोडली.

एवढेच नाही तर बायको व बहिणीचे दागिणेही विकले.

अखेरीस आयुष्याला कंटाळून झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

...आणि एकेदिवशी 16 नोव्हेंबर रोजी स्वतःला गोळी घातली.

ज्या कुणाला ही वेदनादायी घटना समजली, त्याच्या तोंडात एकच प्रश्न होता - अखेरीस एवढे सुखी संपन्न कुटुंब पाहता पाहता कसे उद्ध्वस्त झाले?

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दिव्य मराठीची टीम स्वर्णकार कॉलनीत पोहोचली. रात्रीचे 10 वाजले होते. खाली कुटुंब व शेजारी बसले होते. तिथे स्मशान शांतता होती. पण घरातील महिलांच्या रडण्याच्या आवाजाने या शांतता भंग झाली.

दिव्य मराठीने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली, तर श्रीमंती, कर्ज व मृत्यूची दुखद गोष्ट उजेडात आली. वाचा, संपूर्ण रिपोर्ट..!

मनमोहन यांच्याकडे 5 लक्झरी कारी होत्या. त्यातील मर्सिडीज त्यांची आवडती होती. मित्र व नातेवाईकांनी पैशांचा तगादा लावल्यामुळे मनमोहन यांना आपल्या सर्वच आवडत्या कारी विकाव्या लागल्या.

टर्नओव्हर पाहून जाळ्यात अडकवले

शास्त्री नगरातील स्वर्णकार कॉलनीत राहणाऱ्या मनमोहन सोनीचे (41) एका मोठ्या रस्त्यावर दाग-दागिण्यांचे दुकान होते. भाऊ रोहित सोनीने सांगितले की, मनमोहन त्यांच्या व्यवसायाचा चांगला टर्नओव्हर होता. पण रिस्कही तेवढीच होती.

सत्यार्थ तिवारीला ते जवळपास 20 वर्षांपासून ओळखत होते. सत्यार्थचे वडिल रमेशचंद तिवारी रिटायर्ड डीएसपी होते. मुलगा व वडील फायनांसचा व्यवसाय करत होते. सत्यार्थने कोट्यवधींचा व्यवसाय पाहून 2015-16 पासून मनमोहनला मैत्रीच्या जाळ्यात अडकवले. त्याला सोने-चांदीचा व्यवसाय धोकादायक असल्याचे सांगितले. आपल्यासोबत फायनांसच्या व्यवसायात उतरवण्यास भाग पाडले. तू आम्हाला केवळ पत पुरवठा कर. आम्ही लोकांना व्याजाने पैसे देऊन तुला दरमहा लाखो रुपये देऊ, असे ते म्हणत.

लाखाला दरमहा 1 हजार देण्याचे आमिष

सत्यार्थने मनमोहनला सांगितले - ‘आम्ही ज्या लोकांना बँक किंवा अन्य कुणी पैसे देत नाही त्या लोकांना कर्ज देतो. पैसे उधार देऊन त्यांच्याकडून 3-4 पट व्यास वसूल करतो. आम्ही तुला 1 लाख रुपयाचे दरमहा 1 हजार व्याज कमाऊन देवू. माझे वडील रिटायर्ड डीएसपी आहेत. माझे मेहुणे सचिन शर्मा एसीबीत डीएसपी आहेत. आमची सर्वच पोलिस ठाण्यांत ओळख आहे. कुणी पैसे परत केले नाही तर आम्ही पोलिसांच्या मदतीने पैसे वसूल करून घेऊ.

आरोपींनी मनमोहन यांच्याकडून 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर व्याज देणे बंद केले. म्हणाले - कोरोनामुळे तोटा झाल्यामुळे पैसे बुडाले. अखेरीस त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.
आरोपींनी मनमोहन यांच्याकडून 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर व्याज देणे बंद केले. म्हणाले - कोरोनामुळे तोटा झाल्यामुळे पैसे बुडाले. अखेरीस त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.

कुटुंब, मित्रांना दूर करुन जाळ्यात ओढले

मनमोहन यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सत्यार्थ तिवारी, यथार्थ तिवारी, रमेशचंद तिवारी, एनी भारद्वाज व लोकराज पारीख दररोज त्यांना घेण्यासाठी आपल्या कारमधून जात होते.

सत्यार्थ कधी रेंज रोव्हर तर कधी मर्सिडीसमध्ये मनमोहन यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होता. त्यानंतर दिवसभर आपल्यासोबत ठेवल्यानंतर रात्री घरी नेऊन सोडत होता. आरोपींनी मनमोहन यांना ब्रेनवॉश करून आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना त्यांचे कुटुंबीय व मित्रांपासून दूर केले.

जवळपास 6 महिन्यांपर्यंत ते मनमोहन यांच्यासाठी टिफिनही घेऊन येत होते. आरोपी त्यांना रेंज रोव्हर व मर्सिडीजमध्ये फिरवून पार्ट्यांनाही घेऊन जात. तिथे मोठ-मोठ्या लोकांची भेट घडवून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत.

मनमोहन त्यांच्या जाळ्यात अडकल्यानंतर सत्यार्थ तिवारीने 2016 मध्ये पहिल्यांदा त्यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले. त्यानंतर 2017-18 मध्ये त्यांचे दुकान जवळपास 20 लाख रुपयांना विकून टाकले. दुकानाचे 20 लाख रुपये घेऊन आपल्या फायनांसच्या धंद्यात लावले.

आरोपींच्या चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषामुळे मनमोहन यांनी आपली बहिण, भाऊ, चुलत भाऊ व मित्रांकडून पैसे घेऊन त्यांना दिले. 40 लाख रुपयांचे कर्ज तब्बल 6 कोटींपर्यंत पोहोचले.

घरावर लोन घेतले, नातेवाईकांचेही पैसे लावले

दुकान विकल्यानंतर सत्यार्थ तिवारीने मनमोहन यांची कोट्यवधी रुपये फायनांसमध्ये लावण्याची सूचना केली. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या घरावर 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे कर्ज वाढून 1 कोटी 86 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर नातेवाईकांकडूनही पैसे घेऊन फायनांसमध्ये ओतण्यास सांगितले. त्यानुसार मनमोहन यांनी आपल्या बहिणी, भाऊ, चुलत भाऊ व मित्र परिवाराकडून पैसे घेऊन आरोपींना दिले. आरोपींनी मनमोहन यांच्याकडून जवळपास 6 कोटींची रकम घेऊन फायनांसमध्ये लावली.

आरोपींना मनमोहन यांच्याकडे खूप पैसा असल्याचे ठावूक होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे ब्रेनवॉश करून आमिष दाखवून त्यांना त्यांच्या कुटुंब व मित्रांपासून दूर केले.
आरोपींना मनमोहन यांच्याकडे खूप पैसा असल्याचे ठावूक होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे ब्रेनवॉश करून आमिष दाखवून त्यांना त्यांच्या कुटुंब व मित्रांपासून दूर केले.

विश्वास जिंकण्यासाठी 5 महिन्यांपर्यंत व्याज देत होते आरोपी

आरोपींनी मनमोहन यांना प्रारंभी दरमहा 1 लाख रुपयांना 1 हजार रुपये नफा दिला. त्यानंतर मनमोहन त्यांच्या जाळ्यात अडकत गेले. त्यांनी आपले दुकान विकले. त्यानंतर घरावर कर्ज घेऊन तो पैसाही फायनांसमध्ये लावला. त्यानंतर आपला भाऊ, त्याची पत्नी, बहिणीसह कुटुंबातील 15 जणांकडून लाखो रुपये घेऊन ते ही फायनांसमध्ये लावले. दरमहा व्याज मिळाल्यामुळे ओळखीचे लोकही पैसे लावू लागले. आरोपींनी मनमोहन यांच्याकडून तब्बल 6 कोटी रुपये उकळल्यानंतर व्याज देणे बंद केले. मनमोहन यांनी पैशाचा तगादा लावल्यामुळे आरोपींनी बहाणेबाजी सुरू केली. कोरोनामुळे पैसे बुडाल्याचे सांगितले.

अंध मेहुण्याचे दागिणेही विकले, 25 लाख हडपले

मनमोहन यांचे मेहुणे लोकेश मधुमेही आहेत. त्यांच्या लिव्हर व पायाचे ऑपरेशनही झाले आहे. डोळेही खराब झालेत. 7 वेळा ऑपरेशन करूनही केवळ 20 टक्के नजर आली.

बेरोजगार लोकेश यांनाही आरोपी लोकराजने आपल्या जाळ्यात ओढले. पैसे दिले तर आपण दरमहा पैसे कमावून देऊ असे त्यांनी त्यांना सांगितले. लोकराजने लोकेशची सर्वच जमापुंजी व दागिणे विकून जवळपास 25 लाख रुपये उकळले. त्यानंतर तोटा झाल्याचे सांगून पैसे परत देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर लोकेशविरोधात पोलिसांत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली.

हे आहेत आत्महत्येस मजबूर करणारे आरोपी. सत्यार्थ तिवारी, लोकपाल पारीख व रिटायर्ड डीएसपी रमेशचंद. व्यावसायिक वादानंतर उद्योगपतीच्या पत्नीने 2020 मध्ये शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण रमेशचंद यांनी आपला धाक दाखवून हे प्रकरण दाबले. त्यानंतर ते मनमोहन यांना धमकावू लागले.
हे आहेत आत्महत्येस मजबूर करणारे आरोपी. सत्यार्थ तिवारी, लोकपाल पारीख व रिटायर्ड डीएसपी रमेशचंद. व्यावसायिक वादानंतर उद्योगपतीच्या पत्नीने 2020 मध्ये शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण रमेशचंद यांनी आपला धाक दाखवून हे प्रकरण दाबले. त्यानंतर ते मनमोहन यांना धमकावू लागले.

घर खर्चासाठी घर विकले

पैशाच्या जाळ्यात अडकल्यानंतर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी मनमोहन यांना आपले घर विकावे लागले. एका झटक्यात कुटुंब रस्त्यावर आले. घरखर्चासाठी उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. कुटुंब स्वतःच्याच घरात किरायाने राहू लागले.

मर्सिडीजसह 5 कारी व आईचे दागिणे विकले

मनमोहन यांनी सत्यार्थच्या जाळ्यात अडकून आपल्या अनेक नातेवाईक व मित्रांचे पैसे फायनांसमध्ये गुंतवले. आरोपींनी पैसे परत करण्यास नकार दिला. तिकडे मनमोहन यांच्याकडे आता उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. नातेवाईक व मित्र पैशांसाठी तगादा लावत होते. त्यामुळे मनमोहन यांनी समाजातील आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी स्वतःचे घर विकले. त्यानंतर आपली फेवरेट कार मर्सिडीसह 5 लग्झरी कारीही विकल्या. आई, पत्नी व मुलीचे 1 कोटी रुपयांचे दागिणे विकले. त्यानंतरही कोट्यवधीचे कर्ज उरले होते.

पोलिसांनी 2020 मध्ये केस क्लोज केल्यानंतर मनमोहन यांनी कोर्टाकडून पुन्हा गुन्हा दाखल केला. त्यावर ओरीपींनी टॉर्चर वाढवला. याला कंटाळून मनमोहन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ते वाचले.
पोलिसांनी 2020 मध्ये केस क्लोज केल्यानंतर मनमोहन यांनी कोर्टाकडून पुन्हा गुन्हा दाखल केला. त्यावर ओरीपींनी टॉर्चर वाढवला. याला कंटाळून मनमोहन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ते वाचले.

पत्नी म्हणाली - रात्रभर झोपत नव्हते, डिप्रेशनमुळे आमच्याशीही बोलत नव्हते

मनमोहन यांची पत्नी नीतू यांनी सांगितले की, आरोपींच्या धमक्यांना कंटाळून ते अनेक महिन्यांपासून रात्री झोपत नव्हते. टेंशन एवढे होते की ते दिवसभर विचार करत होते. नैराश्यामुळे ते आमच्याशी बोलतही नव्हते. मला म्हणत होते - मी सत्यार्थ तिवारीच्या आमिषाला भुलून संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आणले. आता ते मला धमकावतात. मला त्रास देतात. मला याचा कंटाळा आला आहे.

त्यांची मरण्याची इच्छा नव्हती. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओत सांगितले की, ते अनेक दिवसांपासून विचार करत होते. पण हिंमत होत नव्हती. पण पोलिस व प्रशासनाने मदत केली नाही. आरोपीही वारंवार धमकावत होते. 2020 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे त्यांची हिंमत तुटली. त्यांनी घर, कारी, दागिणे सर्वकाही विकले. पण कर्ज फिटले नाही. परिणामी त्यांनी आत्महत्या केली. माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही.

मुलीच्या लग्नाचे दागिणेही विकले

नीतू म्हणाल्या - आम्हाला दोन मुले आहेत. यश (19) बीकॉम द्वितीय वर्षात शिकत आहे. तर मुलगी इशिता (15) 12वीत शिकत आहे. त्यांचे शिक्षण व कोचिंगसाठी त्यांनी 20 लाख रुपयांची एफडी बँकेत केली होती. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी ते ही विकले.

मनमोहन यांनी आपल्या पैशांची मागणी केल्यानंतर आरोपी त्यांना धमकावत होते. घरी बोलावून टॉर्चर करत होते. आमच्याकडे तुझे कोणतेही पैसे नाहीत, असे ते त्यांना सांगत होते.

सत्यार्थ तिवारी : लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी लग्झरी गाड्यांत फिरतो

सत्यार्थ तिवारी फायनांसचा व्यवसाय करतो. सी स्कीममध्ये प्रायव्हेट फायनांसचे कार्यालय व शास्त्रीगरमध्ये घर आहे. तो लोकांना घरबसल्या लाखो रुपये कमावण्यासाठ फायनांसमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देतो. त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सत्यार्थ रेंज रोव्हर व मर्सिडीजमध्ये फिरतो. पैसे बुडाल्यानंतर कुणी पैसे मागितले तर आपले रिटायर्ड डीसएपींची भीती दाखवून त्यांचे तोंड बंद करतो. मनमोहन यांनीही आपल्या पैशांची मागणी केली तेव्ही सत्यार्थ यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांना धमकावले. यासाठी आपला डीएसपी मेहुणा सचिन शर्माचीही मदत घेतली.

रिटायर्ड DSP रमेशचंद तिवारी: दोनवेळा फाइल बंद केली

मनमोहन यांनी सर्वप्रथम 2020 मध्ये शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. रिटायर्ड डीएसपी रमेशचंद यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या ओळखीच्या बळावर हे प्रकरण दाबले. त्यानंतर मनमोहन यांनी कोर्टाकडून तक्रार दाखल केली. त्यानंतरही रमेशचंद यांनी केस बंद केली. 18 डिसेंबर रोजी त्यांनी कंटाळून झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने आरोपींविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण यावेलीही रमेशचंद यांनी एफआर लावून केस बंद केली.

लोकराज पारीख: मनमोहन यांच्या नातेवाईकांकडून 40 लाख रुपये घेतले

लोकराज पारीख आरोपींचा पार्टनर आहे. तो निर्माण नगरात राहतो. लोकराजने मनमोहन यांच्या नावाने त्यांच्या नातलगांकडून 40 लाख रुपये उकळले. ते ही फायनांसमध्ये लावले. मनमोहन यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली.

एनी भारद्वाज-यथार्थ: काही महिने कमिशन दिले, त्यानंतर पैसे बळकावले

एनी भारद्वाज व यथार्थ तिवारीही आरोपींच्या फायनांसमध्ये पार्टनर होते. आरोपींनी लोकांना 4-5 महिने कमिशनच्या नावाने दरमहा पैसे दिले. त्यानंतर कोरोनात तोटा झाल्यामुळे ते हडप केले.

आत्महत्येनंतर आरोपींना अटक

आरोपींच्या छळाला कंटाळून मनमोहन यांनी 16 नोव्हेंबर रोजी गोळी घालून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर कुटुंब व नातेवाईकांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करुन बॉडी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे नाईलाजाने पोलिसाना सत्यार्थ, लोकराज व रमेशचंद यांना अटक करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...