आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jaipur Delhi (Coronavirus) COVID 19 Vaccine Tracker Update | Corona Vaccination State Wise List Updates; Gujarat Maharashtra Madhya Pradesh Haryana Chhattisgarh Jharkhand Till March 13

देशात कोरोना लसीकरण:आठवड्यात दुसऱ्यांदा देण्यात आले 20 लाखांपेक्षा जास्त व्हॅक्सीन डोस; राजस्थाननंतर महाराष्ट्रातही 25 लाख डोसचा आकडा ओलांडला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार देशात आतापर्यंत व्हॅक्सीनचे 2.82 कोटी डोस देण्यात आले आहेत.

भारतात कोरोना विरोधात लसीकरणाने महाशिवरात्रीला थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वेग पकडला आहे. महाशिवरात्रीला 5 लाख डोस देण्यात आले होते. तर याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चार पटींनी जास्त 20 लाख डोज देण्यात आले. यामध्येही 11 लाखांपेक्षा जास्त डोस हे सीनियर सिटीजन्सला देण्यात आले. राजस्थाननंतर महाराष्ट्रानेही 25 लाख डोसचा आकडा पार केला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार 13 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार देशात आतापर्यंत व्हॅक्सीनचे 2.82 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्येही 2.30 कोटी पहिले डोस आणि 51.43 लाख दुसरे डोज देण्यात आले आहेत. याचा अर्थ 51 लाख लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.

देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच लसीकरणाची सुरुवात झाली होती. 12 मार्च रात्री 8 वाजेपर्यंत हेल्थकेअर वर्कर्सला 72.84 लाख पहिले डोज आणि 41.76 लाख दूसरे डोस देण्यात आले आहेत. नंतर 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती.12 मार्चच्या रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना 72.15 लाख पहिले आणि 9.28 लाख दूसरे डोस देण्यात आले आहेत.

1 मार्चपासून सरकारने सीनियर सिटीझन आणि 45-59 वर्षांच्या गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना लसीकरणात सामिल केले. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. यानंतरपासून आकड्यांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत 71.70 लाख सीनियर सिटीजन आणि 12.30 लाख हाय-रिस्क असणाऱ्या 45-59 वर्षांच्या लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...