आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्याने चुलतीचे हातोड्याने फोडले डोके, 8 तुकडे केले:बाथरूममध्ये ग्राइंडरने कापला मृतदेह; जंगलात फेकले अवयव, जयपूरची घटना

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडासारखी घटना जयपूरमध्येदेखील घडली आहे. पुतण्याने आपल्या चुलतीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ग्राइंडरने बाथरूममध्ये सुमारे 8 तुकडे केले. संधी मिळताच तिच्या मृतदेहाचे तुकडे दिल्ली-सीकर महामार्गावर वेगवेगळ्या तीन ठिकाणी फेकून दिले.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना 11 डिसेंबर रोजी विद्याधर नगरातील सेक्टर 2 मध्ये घडली. मृत सरोज देवी (62) यांनी तिच्या दिराचा मुलगा अनुज शर्मा याला धार्मिक कार्यक्रमात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्याने रागाच्या भरात चुलतीची हत्या केली. याप्रकरणी मृत सरोज देवी यांच्या मुली पूजा शर्मा (38) आणि मोनिका शर्मा यांनी शुक्रवारी त्यांच्या आईच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तर त्यांनी चुलतभाऊ अनुज शर्मावर हत्येचा संशय व्यक्त केला होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपी अनुजला अटक केली आहे.

आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दोन्ही मुली विवाहित, मुलगा परदेशात असतो

पूजा आणि मोनिका शर्मा या विवाहित आहेत. तर त्यांचा भाऊ अमित परदेशात राहतो. पूजाचे सासर बिकानेरला आहे. तिने सांगितले की, 1995 मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून आई सरोज देवी माझे काका बद्रीप्रसाद शर्मा यांच्यासोबत विद्याधर नगरात राहत होती. या खून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कुटुंबाचीही चौकशी केली जाईल.

कीर्तनाला जाण्यापासून रोखले, म्हणून राग अनावर

सकाळी 10.30च्या सुमारास ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी एका धार्मिक चळवळीशी संबंधित आहे. तिला हजेरी लावण्यासाठी तो दिल्लीला जाणार होता. पण सरोज देवींनी त्याला थांबण्यास सांगितल्याने त्याला राग आला. त्यानंतर पुतण्या अनुज शर्माने चुलतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने चाकूने मृतदेह कापण्याचा प्रयत्न केला. परंतु हाडे कापली जात नव्हती. अखेर त्याने मृतदेह बाथरूममध्ये ओढत नेला. तो बाजारात गेला. त्याने ग्राइंडर आणले. त्याने मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. त्यानंतर पुतण्याने तीन तास मृतदेहाची विल्हेवाट लावली.

रक्ताचे डाग साफ करताना दिसला

12 डिसेंबर रोजी आरोपी अनुजने पूजाला फोन करून सांगितले की, 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोठी आई (सरोज देवी) भाकरी देण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यानंतर परत आलीच नाही. विद्याधर नगर पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. माहिती मिळताच मोठी बहीण मोनिका त्याच दिवशी अनुजच्या घरी आली. 13 डिसेंबर रोजी मोनिका घरी होती. अनुज भिंतीवरचे रक्ताचे डाग कापडाने साफ करत होता. मोनिकाने त्याला विचारल्यावर तो घाबरला. मला नाकातून रक्त येत असल्याचे त्याने सांगितले. मी भिंतीवर पडलेले डाग साफ करत आहे. असा तो म्हणाला. त्यावरून मोनिकाला संशय आल्याने तिने आपली धाकटी बहीण पूजाला फोन करून सांगितले. यावर पूजाही 15 डिसेंबरला पतीसोबत त्यांच्याघरी पोहोचली.

मृतदेहावर माती टाकली, बॅगदेखील धूवून काढली

घटनेनंतर अनुज सुमारे तीन-चार तास मृतदेहाचे तुकडे घेऊन फिरत होता, असे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत एक बकेट देखील होती. सीकर-दिल्ली महामार्गावरील एका वनविभागाच्या चौकीच्या मागे त्याने मृतदेह फेकून त्याने त्यावर बादलीतून माती टाकली. यानंतर तो बॅग आणि बॉटल घेऊन घरी परतला. त्याने परत आणलेल्या बॅग देखील धूवून काढली आहे.

आरोपी पुतण्या हरिद्वारला गेला निघून
घरी पोहोचल्यावर पूजाने तिच्या मोठ्या बहीणीला म्हणजे मोनिकाला तिचा चुलत भाऊ अनुजबद्दल विचारले तेव्हा मोनिकाने सांगितले की, अनुज हरिद्वारला गेला आहे. दोन्ही बहिणी आपापसात बोलल्या तेव्हा अनुजबाबत त्यांचा संशय बळावला. यानंतर दोन्ही बहिणींनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या बेपत्ता आईची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. दोन्ही बहिणींनी अनुजवरच संशय व्यक्त केला. त्यानंतर तपासाला सुरूवात केली.

आरोपीने आभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे

डीसीपी नॉर्थ पॅरिस देशमुख यांनी सांगितले की, अजमेर रोडवरील भांक्रोटा (जयपूर) येथील आरोपी अनुज शर्माने इंजिनिअरिंगीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी 1 वर्षापूर्वी 'हरे कृष्ण' चळवळीतून दीक्षा घेतली होती. वडील पंजाब नॅशलन बॅंकेतून एजीएम पदावरून निवृत्त झालेले आहेत. घटनेच्या वेळी कुटुंबीय मुलीसाठी नाते पाहण्यासाठी दिल्लीला गेलेले होते. सरोज देवी गेल्या 3-4 वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांची केमोथेरपी चालू होती.

बातम्या आणखी आहेत...