आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एका मुलीचे पांढरे रक्त पाहून डॉक्टरही चकित आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये जेके लोन रुग्णालयाच्या रेअर डिसीज युनिटमध्ये ३ महिन्यांची एक मुलगी ‘हिना’च्या रक्ताचा रंग तपासणीत पांढरा असल्याचे समोर आले. त्यात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायडची मात्रादेखील जास्त आढळली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सरकारी रुग्णालयात शक्यतो कोणत्याही कमी वयाच्या मुलीमध्ये लालऐवजी पांढरे रक्त आढळणे हे पहिले प्रकरण आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला ‘डिसलिपेडेमिया विथ हिमोलायटिक अॅनिमिया’ म्हणतात. कमी वयाच्या लाखो मुलांपैकी एखाद्या मुलांमध्ये हा रोग आढळतो. हिनाची केस स्टडी आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवली जाईल. जेके लोन रुग्णालयाचे बाल रोगतज्ज्ञ आणि रेअर डिसीज युनिटचे प्रमुख डॉ. अशोक गुप्ता यांच्या मते, ट्रायग्लिसरायड आणि कोलेस्टेराॅलची मात्र जास्त असल्याने जीवाला धोका आहे.
रक्ताचा रंग पांढरा कसा झाला ?
ट्रायग्लिसरायडची मात्रा जास्त झाल्यावर आरबीसीच्या पडद्यावर ते जमू लागते. यात लाल कण फाटतात (हिमोलिसिस) आणि हिमोग्लोबिन कमी होत जाते. रक्तात ट्रायग्लिसरायड आणि कोलेस्टेराॅल जास्त झाल्याने रक्ताचा रंग दुधासारखा पांढरा दिसू लागतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.