आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानशी चर्चेसाठी भारताची अट:जयशंकर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना म्हणाले - रशियन तेल खरेदीवर EUने आम्हाला लेक्चर देऊ नये

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्यासाठी एक अट ठेवली. ते म्हणाले -पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडत नाही तोपर्यंत भारत त्याच्याशी चर्चा करणार नाही. जयशंकर यांनी हे विधान जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बेयरबॉक यांच्याशी चर्चा करताना केले.

माध्यमांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की, मी पाकच्या मुद्यावर अन्नालेना बेयरबॉकशी चर्चा केली. मी सीमापार दहशतवादाच्या मुद्यावर त्यांना भारताच्या चिंता बोलून दाखवल्या. पण सर्वात मोठे आव्हान हे आहे की आम्ही दहशतवादाच्या छायेत पाकशी चर्चा करू शकत नाही. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यानेही या प्रकरणी भारताची स्थिती समजून घेतली.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या जर्मनीच्या समकक्षांचे आज नवी दिल्लीत स्वागत केले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या जर्मनीच्या समकक्षांचे आज नवी दिल्लीत स्वागत केले.

अफगाणिस्तान व इराणसह अनेक देशांवर चर्चा

एस जयशंकर व जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत केवळ पाकच नव्हे तर युक्रेन युद्ध, अफगाणिस्तान, इराण व सीरियाच्या मुद्यावरही चर्चा झाली. हे भारताच्यावतीने अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जयशंकर यांनी रशियाच्या मुद्यावर भारताची भूमिकाही पुन्हा एकदा स्पष्ट केली.

यूरोपियन देश भारताहून अधिक रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी यावेळी केला.
यूरोपियन देश भारताहून अधिक रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी यावेळी केला.

ईयूने भारताला लेक्चर देऊ नये

जयशंकर म्हणाले की, भारताने आपल्या राष्ट्रीय हितांसाठी रशियासोबत आर्थिक संबंध कायम ठेवेल. या प्रकरणी पाश्चिमात्य देश दुटप्पी भूमिका घेत आहेत. यूरोपियन यूनियन सातत्याने रशियाकडून तेल व इतर संसाधनांची खरेदी करत आहेत. त्यामुळे त्यांनी भारताला असे न करण्याचे लेक्चर देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...