आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jallianwala Bagh Masscare Updates: Today Jallianwala Bagh Masscare Completed 102 Years; News And Live Updates

जालियनवाला हत्याकांडाला 102 वर्षे पूर्ण:बागेची ओळख असलेल्या पाच जागा आता नव्या रूपात; तेरा महिन्यांपासून बंद, श्रद्धांजलीही वाहता येत नसल्याने शहिदांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी देश-विदेशातून 6 ते 8 लाख पर्यटक देतात भेट

मंगळवारी (१३ एप्रिल) जालियनवाला हत्याकांडाला १०२ वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश जनरल डायर याने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना शहीद केले. या घटनेनंतर स्वातंत्र्याची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आणि नंतर शहीद उधमसिंग यांनी समुद्रापार जात डायरला मारून या क्रूर हत्याकांडाचा बदला घेतला. या पवित्र जागेचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ६ ते ८ लाख पर्यटक येतात. जालियनवाला हत्याकांडास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १३ एप्रिल २०१९ रोजी केंद्र सरकारने २० कोटी रुपये खर्च करून बागेचे नूतनीकरण सुरू केले होते, ते आता पूर्ण झाले आहे. यानंतर बागेचे रूप बदलले आहे. बघा, जालियनवाला बागेची ओळख असलेली ही पाच ठिकाणे आता कशी दिसतात : आधी नूतनीकरण व नंतर कोरोनामुळे बाग १३ महिन्यांपासून बंद आहे. आता पुन्हा एकदा उद्घाटन स्थगित झाले आहे. बाग उघडण्यास उशीर होत असल्याने शहिदांचे वंशज आणि अमृतसरचे लोक नाराज आहेत.

शहिदी लाट
शहिदी लाट पाण्याच्या टाकीत उभी दिसेल. त्याभोवती कमळ आणि कुमुदिनीची फुले उमललेली दिसतील. रोज सायंकाळी लाइट अँड साउंड शोद्वारे १३ एप्रिल १९१९ चा पूर्ण घटनाक्रम दाखवला जाईल. आतापर्यंत बाग सायंकाळी ७ वाजताच बंद केली जायची आता रात्री ९ पर्यंत खुली राहील.

गोळ्यांच्या खुणा
बागेच्या आत गोळीबाराच्या खुणा असलेल्या २ भिंती आधीच सुरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र, काळाच्या ओघात जीर्ण होत होत्या. त्यांना काचेचे आवरण करण्यात आले आहे. यामुळे खुणांवर पाऊस व उन्हाचा परिणाम होणार नाही.

शहिदी विहीर
शहिदी विहिरीच्या चारही बाजूंना नानकशाही विटांची १२ फूट उंच वर्तुळाकार भिंत उभी करून त्यात मोठमोठे आरसे लावण्यात आले आहेत. या आरशांमधून लोकांना विहिरीत खोलपर्यंत बघता येईल. रात्री ही विहीर रंगीबेरंगी रोषणाईने उजळेल.

गॅलरी
आधी बागेत गॅलरी व चित्रशाळा होती. तेथे काही स्वातंत्र्यसैनिकांचे छायाचित्र तसेच गोळीकांड दाखवणारे पोर्ट्रेट होते. आता त्यात स्वातंत्र्यात पंजाब व पंजाबींचे योगदान छायाचित्र-पुतळ्यांमधून दाखवण्यात आले आहे. गोळी चालवणाऱ्या ब्रिटिश शिपायांचेही पुतळे आहेत.

मुख्य प्रवेश गल्ली
बागेच्या मुख्य गल्लीच्या दोन्हीकडे फक्त भिंती होत्या. माणसाच्या उंचीएवढे पुतळे लावण्यात आले आहेत. यातून लोक मेळाव्यात जात असल्याचे जाणवते. हे बघून १९१९ च्या वैशाखी मेळाव्याचे चित्र उभे राहते. आधी लोक याच गल्लीतून आत जायचे व बाहेर यायचे. आता फक्त प्रवेश असेल.

बातम्या आणखी आहेत...