आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammi Investment Gained Momentum With The Advent Of Industry Policy; 15 Projects Got Plots Worth Rs 1548 Crore

जम्मू:उद्योग धोरण येताच गुंतवणुकीला मिळाला वेग; 1548 कोटींच्या 15 प्रकल्पांना मिळाले भूखंड

जम्मू / मोहित कंधारी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेस ५ ऑगस्टला २ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत तेथे दहशतवाद, दगडफेक आणि बंदच्या घटना कमी झाल्याने देशभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्थानिक प्रशासन या संधीचा फायदा घेत ब्रँड जम्मू-काश्मीरचा लाभ घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. प्रशासनाने या वर्षी एप्रिलमध्ये लवचिक आणि एक खिडकी असलेले नवे औद्योगिक आणि जमीन वाटप धोरण जारी केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, त्याचा परिणामही दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख सचिव रंजन प्रकाश ठाकूर यांच्या नेतृत्वात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गेल्या महिन्यात जम्मू विभागात १५४८ कोटी रुपयांच्या १५ प्रकल्पांसाठी जमीन वाटप करण्यात आली. त्याद्वारे ५ हजार रोजगार निर्माण होतील. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये २० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्याद्वारे ८४ हजार रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, असे ठाकूर मानतात. त्याचबरोबर, राज्यात विकास कामांना गती देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये नव्या आणि जुन्या औद्योगिक क्षेत्रांत ३३७५ एकरपेक्षा जास्त जमीन बँक तयार झाली आहे. विशेष म्हणजे नवे औद्योगिक धोरण २०२१-३० साठी आहे. या धोरणांतर्गत सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत पात्र असतील. या प्रकल्पांना जीवन देण्यासाठी १००% एसजीएसटीच्या प्रतिपूर्तीचा इन्सेन्टिव्ह मिळेल. प्रशासनाला मोठ्या संख्येत गुंतवणूकदारांचे अर्ज मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ३०,००० कोटींवरून वाढवून ५०,००० कोटी करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी माध्यमांना सांगितले की, राज्यात २५ हजार कोटींची गुंतवणूक मिळू शकते, असा आमचा उर्वरित. पान २

२ एम्स, ७ मेडिकल कॉलेज आणि आयटी पार्कवर काम सुरू
- आजवर ७,१११.७८ कोटींच्या एकूण २,३५७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात १,५५५.१६ कोटी रुपयांचे ११०० प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
- नोव्हेंबर २०१५ मध्ये पीएमच्या विकास पॅकेजअंतर्गत स्वीकृत ५६,२६१ कोटींच्या ५४ प्रकल्पांपैकी जून २०१८ पर्यंत ७ प्रकल्प पूर्ण झाले होते. आता २१ पूर्ण झाले आहेत. आणखी १२ प्रकल्प यंदा पूर्ण होऊ शकतात.
- २ नवीन एम्स, ७ नवीन मेडिकल कॉलेजेस, ५ नवीन नर्सिंग कॉलेजेस, दोन कॅन्सर संस्था, जम्मू आणि श्रीनगरमध्ये मेट्रो, आयटी पार्कसह ७,५०० कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे.
- राज्यात ५ प्रकल्प २० वर्षे, १५ प्रकल्प १५ वर्षे व १६५ प्रकल्प १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. २०२१-२२ मध्ये ८,००० किमी रस्ते निर्मितीचे लक्ष्य होते, २,२०० किमी रस्ते पूर्ण.

बातम्या आणखी आहेत...