आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन वर्षांत प्रथमच:श्रीनगरमध्ये एसआरपीफ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, मोबाईल इंटरनेट सेवा बंद

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहीर अहमद मारला गेला

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी रात्री दोन वाजता एसआरपीएफ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागातील मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ बीएसएनएलची पोस्टपेड सेवा सुरु आहे. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये अशाप्रकारे चकमक झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले आहे की, 'श्रीनगरच्या कानेमजार नवाकदल भागात एनकाऊंटर सुरु झाले. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवान आपले काम करत असून पुढील माहिती लवकर दिली जाईल.'

या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची सूचना पोलिसांनी मिळाल्यानंतर रात्री उशिरा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. जवानांनी काही घरांना घेरले असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यापूर्वी रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहीर अहमद मारला गेला होता. 11 दिवसांपूर्वी मारल्या गेलेल्या रियाझ नाइकूनंतर हे दुसरे मोठे एनकाऊंटर होते. 

बातम्या आणखी आहेत...