आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक:सुरक्षा दलांनी बांदीपोरात 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा, यामध्ये भाजप नेते वसीम बारी यांच्या मारेकऱ्याचाही समावेश

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू -काश्मीरच्या बांदीपोरामध्ये रविवारी सुरक्षा दलांनी केलेल्या एनकाऊंटरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये भाजपचे दिवंगत नेते वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्या मारेकऱ्याचाही समावेश आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, 2 दहशतवाद्यांच्या लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आम्ही त्यांना घेरले आणि आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. त्यांनी हे आवाहन स्वीकारले नाही, त्यानंतर दोघेही चकमकीत ठार झाले. यातील एका दहशतवाद्याने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते आणि दुसरा दहशतवादी वसीम बारीच्या हत्येमध्ये सहभागी होता.

अजूनही एक दहशतवादी लपल्याचा संशय
दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते याची माहिती अद्याप उघड झाली नाही. यासह ते कोणत्या उद्देशाने परिसरात लपले होते, याचाही शोध घेतला जात आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे. असे मानले जाते की त्याचा एक साथीदार या परिसरात लपला आहे.

उरीमध्ये गुरुवारी 3 दहशतवादी ठार
तत्पूर्वी गुरुवारी लष्कराने एलओसीवर उरीजवळ रामपूर सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून लष्कराने 5 एके -47 रायफल, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड जप्त केले.

दहशतवाद्यांकडून सापडलेला पाकिस्तानी चनन मिळाले
चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल डीपी पांडे यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. ते पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाले. गेल्या 4 दिवसांपासून शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 18 सप्टेंबरलाही घुसखोरीचा प्रयत्न झाला. तोही उधळला गेला.​​​​​​​

शोपियानमध्ये एक दहशतवादी ठार
गुरुवारीच शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्याच्या जैनपुरा भागातील काशवा गावात शोध घेण्याचे काम सुरू केले. ते म्हणाले, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ऑपरेशन चकमकीत बदलले. लष्करानेही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...