आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir Budgam Encounter Security Forces Killed Terrorist Absconding Arrested; News And Live Updates

जम्मू-काश्मीरमध्ये एनकाऊंटर:बडगाममध्ये सुरक्षा दलांकडून एक दहशतवादी ठार, दुसरा अटकेत; एके-47 आणि पिस्तूल जप्त

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिस अलर्टवर

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून दुसऱ्याला अटक केली आहे. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून एके-47 आणि पिस्तूल जप्त केले.

मृतक दहशतवाद्याची ओळख पटली आहे. त्याचे नाव साकिब डार असून तो अवंतीपुरा येथील रहिवाशी आहे. हे दोन्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटन लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे. चकमकीदरम्यान, एक दहशतवादी ट्रकमधून फरार झाला होता. परंतु, त्याला पुलवामा येथील ख्रीव भागातून अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी लष्कर घेत आहे शोध
पोलीस अधिकारी म्हणाले की, सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित परिसराचा शोध घेत आहे. दहशतवाद्यांच्या लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी आज पहाटे शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला.

काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिस अलर्टवर
5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याला 2 वर्षे पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दल आणि पोलीस अलर्टवर असून संबंधित भागात शोधमोहीम राबवली जात आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले होते. यामुळे राज्यात अनेक दिवस इंटरनेट सेवा बंद होती. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट रोजी श्रीनगरच्या डाऊन भागात दहशतवादी हल्ला झाला होता. तर संध्याकाळी बेमिना परिसरातील एसएसबी पोस्टवर दुसरा स्फोट झाल्याची घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...