आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जम्मू-काश्मीरमध्ये एनकाउंटर:श्रीनगरच्या रनबीरगडमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवादी ठार, यातील एक लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर होता

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या महिन्यात 9 एनकाउंटरमध्ये 19 दहसतवादी मारले

रनबीरगड परिसरात सुरक्षा दलाने शनिवारी(दि.25) एनकाउंटरमध्ये लश्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक लश्करचा टॉप कमांडर इशफाक राशिद होता. तर, दुसऱ्याचे नाव एजाज अहमद होता.

दहशतवाद्या लपल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्मी आणि पोलिस जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केला होता. यादरम्यान, दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली, त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले.

या महीन्यात 9 एनकाउंटरमध्ये 19 दहशतवादी ठार

तारीखठिकाणदहशतवादी ठार
2 जुलैमालबाग (श्रीनगर)1
4 जुलैअर्राह (कुलगाम)2
7 जुलैगोसू (पुलवामा)1
11 जुलैनौगाम (कुपवाड़ा)2
12 जुलैसोपोर (बारामूला)3
13 जुलैश्रीगुफवाड़ा (अनंतनाग)2
17 जुलैनागनाद शिमर (कुलगाम)3
18 जुलैअमशिपोरा (शोपियां)3
25 जुलैरनबीरगढ़ (श्रीनगर)2