आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाने दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला. यादरम्यान अवंतीपोरा परिसरातून सैन्याने गुरुवारी दहशतवादी संघटना अल-बद्रसंबंधीत 4 दहशतवाद्यांना पकडले आहे. परिसरात सर्च ऑपरेशनदरम्यान सैन्याला हे यश मिळाले. तसेच, बारामुलाचे दहशतवादी लपलेले असल्याची सूचना दिल्यावर सैन्य आणि पोलिस सर्च ऑपरेशन करत आहेत. याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर फायरिंग केली. सैन्य त्याचे सडेतोड उत्तर देत आहे.
हत्यार आणि दारु-गोळा जप्त
पोलिसांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी असल्याची सूचना मिळाल्यावर पोलिसांनी CRPF सोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशनदरम्यान तिथे लपवून ठेवलेले हत्यार आणि दारु-गोळा जमा केला. यामध्ये एक AK56 रायफल, एक AK56 मॅगजीन, 28 दारु-गोळा आणि एक हँड ग्रेनेड आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख यावार अजीज दार, सज्जाद अहमद पार्रे, आबिद मजीद शेख आणि शौकत अहमद डार अशी आहे. अद्याप तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते.
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला
त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की बारामुल्लातील करीरी भागातील वाणीगम पाईन येथे दहशतवाद्यी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्य आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
13 डिसेंबर रोजी 2 दहशतवादी ठार झाले
13 डिसेंबर रोजी सुरक्षा दलांनी पुंछमध्ये जम्मू-काश्मीर गझनवी फोर्सच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले आणि एका दहशतवाद्याला पकडले. साजिद आणि बिलाल असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या वर्षाच्या गुप्तचर अहवालात असे दिसून आले आहे की, गझनवी फौज जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटनेने तयार केली आहे. यामध्ये पुलवामासारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.