आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir Encounter News|a Terrorist Killed In An Encounter With Security Forces In Pulwama , A Soldier Also Martyred; Search Operation In Progress

जम्मू-काश्मीरात एन्काउंटर:पुलवामामध्ये सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन जारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैन्याचा एक जवान जखमी, 92 बेस हॉस्पिटलमध्ये करण्यात आले जखमी
  • दहशतवादी असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफने जॉइंट ऑपरेशन सुरू केले

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर सैन्य घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने सीआरपीएफसमवेत ही शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या या परिसराला घेराव घालण्यात आला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक मीडियाच्या म्हणण्यानुसार, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतला आहे. चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी 92 बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

मंगळवारी 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी कुपवाडा येथून हिज्बुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना अटक केली. परवेज अहमद भट, अल्ताफ अहमद मीर, गुलाम मोहम्मद गुजर आणि अब्दुल कय्यूम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एके 47 राइफल, 2 पिस्तूल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

6 महिन्यात 4 दहशतवादी संघटनांचे प्रमुख ठार

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 6 महिन्यांत 4 मोठ्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचा खात्मा करण्यात आला आहे. जूनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेटमधील तीन अतिरेक्यांना ठार केले. त्यातील एक हिजबुल दहशतवादी होता. जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवत-उल हिंद यांचे नेते या सैन्य आणि पोलिसांच्या कारवाईत मारले गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...