आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-कश्मीरच्या अनंतनाग परिसरात मंगळवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. एन्काउंटरमध्ये सुरक्षादलाने लष्करच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यापूर्वी कोकेरनागच्या वायलूमध्ये लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी लपलेले असल्याची सूचना मिळाल्यावर सुरक्षादलाने सर्च ऑपरेशन सुरू केले होते. जम्मू-कश्मीर पोलिसच्या आयजीने सांगितले की, सुरक्षादलाने लष्करच्या दहशतवाद्यांना घेरले होते. दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली. जवाबी कारवाईत तिघांनाही ठार करण्यात आले.
जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात दहशतवादी चकमकीची तिसरी घटना
सोपोरमध्ये मारल्या गेलेला दहशतवादी नगरसेवकाच्या हत्येत सहभागी होता
नाथीपोरा परिसरात ठार झालेल्या दहशतवाद्यांमधून एक गेल्या महिन्यात 2 नगरसेवकांच्या हत्येमध्ये सामिल होता. गेल्या महिन्यात शोपियांच्या हादीपोरामध्येच सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमधील एन्काउंटरमध्ये 3 दहशतवादी ठार झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.