आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:महामारीमुळे जम्मू-काश्मीरची गुंतवणूक परिषद स्थगित, तरीही कंपन्या 23 हजार कोटींच्या गुंतवणुकीस तयार

श्रीनगर / मुदस्सिर कुल्लू9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षण, आरोग्य, कृषी, आयटीसह अनेक क्षेत्रांत दाखवला रस

कोविडच्या काळातही जम्मू-काश्मीरमधून दिलासादायक वृत्त आहे. येथे गुंतवणुकीची लाटच येत आहे. राज्य सरकारने मागील वर्षापासून आतापर्यंत ४०० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करारांवर स्वाक्षरी केली आहे. या कंपन्या राज्यात १८ क्षेत्रात २३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यटन, आयटी, हस्तकला, अन्न प्रक्रिया, औषधी, कौशल्य विकास, दुग्ध- पोल्ट्री, पायाभूत सुविधा, औषधी वनस्पती, चित्रपट, अक्षय ऊर्जाच्या क्षेत्रात कंपन्यांनी रस दाखवला आहे.

आरोग्य सुविधा क्षेत्रात आत्मीय फील्डकॉन ६५० कोटी तर एचपी कॅपिटलला २ हजार कोटींची गुंतवणूक करायची आहे. आरके असोसिएट्सला ५०० कोटी गुंतवणूक करून हॉटेल सुरू करायचे आहे. तर नॅशनल अॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला १७०० कोटीची गुंतवणूक करायची आहे. फ्लिपकार्टला स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला बाजार मिळवून द्यायचा आहे. अबुधाबीची कंपनी लुलू अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करू इच्छिते. गुंतवणुकीस इच्छुक कंपन्यांमध्ये रिलायन्स अॅम्युनिशन, जॅक्सन ग्रुप, इंडो- अमेरिकन सिनर्जी, कृष्णा हायड्रो प्रोजेक्ट्स, युनिव्हर्सल सक्सेस इंटरप्रायजेस, सर्वोटेल, श्री सिमेंटचा समावेश आहे. गेल्या वर्षी सरकारला गुंतवणूक संमेलन घ्यायचे होते, मात्र काेरोनामुळे स्थगित करावे लागले.

शिक्षणात गुंतवणुकीमुळे मुलांना बाहेर जावे लागणार नाही
शिक्षण क्षेत्रातही अनेक कंपन्यांनी रस दाखवला आहे. राज्यातील हजारो मुले वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी रशिया, तुर्की, इराण, बांगलादेश, यूके तसेच देशातील इतर शहरात विविध संस्थांमध्ये जातात. जर या कंपन्यांनी राज्यात शिक्षण संस्था सुरू केल्या तर मुलांना बाहेर जावे लागणार नाही. आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे उपचारासाठी लोकांना बाहेर जावे लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...